Ashish Shelar  Saam tv
मुंबई/पुणे

MNS BJP Mahayuti : मनसे-भाजप युती होणार का? आशिष शेलार स्पष्टच बोलले, राज ठाकरेंनी तर एकाच वाक्यात विषय संपवला

Ashish Shelar and raj thackeray meet : दोन्ही बड्या नेत्यांच्या चर्चेनंतर भाजप आणि मनसे युतीविषयी राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. या चर्चेदरम्यान आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.

Vishal Gangurde

गिरीश कांबळे, मुंबई

Ashish Shelar News :

भाजप नेते आशिष शेलार यांनी आज सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली. दोन्ही बड्या नेत्यांच्या चर्चेनंतर भाजप आणि मनसे युतीविषयी राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. या चर्चेदरम्यान आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधत भाजप-मनसे युतीच्या चर्चेला पूर्णविराम दिला. 'साथ वगैरेचा सवाल नाही. आम्ही राजकीय मित्र आहोत. त्यामुळे भेटत असतो, असं भाष्य करत आशिष शेलारांनी भाजप-मनसे युतीच्या चर्चांना पूर्णविराम दिला. (Latest Marathi News)

आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. आशिष शेलार म्हणाले, 'मन की बात झाली, जण की बात झाली. राजकारणात भेटीगाठी होत असतात. त्या चर्चा होत असतात. राजकीय निर्णय अद्याप काहीच नाही. योग्य वेळी ते चित्र स्पष्ट होईल. देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत तर चित्र स्पष्ट होईल'. . ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काँग्रेस नेत्यांच्या भाजप प्रवेशावर भाष्य करताना आशिष शेलार म्हणाले, 'काँग्रेसची आजची अवस्था बिकट आहे. राज्यातील असो किंवा देशातील काँग्रेस असो मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे खासदार आणि लोक इकडे येणार आहेत. पुढच्या काळात आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकटेच राहतील. त्यामळे त्यांनी आपले बळ आहे तेवढेच बोलावे. ते महाराष्ट्रात फिरत आहेत. त्यांना लखलाभो.. आदित्य ठाकरे कुठे आहेत, वरळीतील लोक दुर्बीण लावून शोधत आहेत. वरळीत इमारती बांधण्याचा प्रस्ताव उद्धव ठाकरेंनी पास केला आहे. आता लोक त्रस्त आहेत. त्यामुळे लोकांवर अधिक बोजा आला आहे'..

आशिष शेलारांची आदित्य ठाकरेंवर टीका

' कोळी समाजाचे लोक दोन पिलरमधील अंतराबाबत आदित्य ठाकरेंच्या मागे लागले होते. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रश्न सोडवला. अनेक प्रश्न वरळीत पडले आहेत, या सगळ्यांकडे न बघता ते गावभर फिरत आहेत. ते आता आदित्य ठाकरे निवडणुकीवर बोलत आहेत. आदित्य ठाकरेंना निवडणुकीची खुमखुमी असेल तर राजीनामा द्यावा. त्यानंतर आमच्या महायुतीविरिधात लढावं. त्यांना वरळीत धक्का बसणार आहे. त्यामुळे ठाण्यात येतो-येतो करत आहेत, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.

राज ठाकरेंनी निवडणूक आयोगावर केलेल्या भाष्यावर आशिष शेलार म्हणाले, 'मला असं वाटतं की, शिक्षकांचे प्रश्न आणि त्यांची मागणी अयोग्य नाही. आम्ही म्हणतोय, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत आहेत की, वन नेशन-वन इलेक्शन. प्रत्येक वेळेला बाय इलेक्शन आणि प्रत्येक वेळी महानगर पालिका, जिल्हा परिषद, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका यामध्ये प्रत्येक वेळी मेहनत आणि पैसे लागत आहेत. वन नेशन आणि वन इलेक्शन केले पैसे वाचणार नाही का, त्यामुळे राज ठाकरेंनी 'वन नेशन वन इलेक्शन' हा जो प्रस्ताव आहे त्याला पाठिंबा द्यावा'.

भाजप आणि मनसे युतीच्या चर्चेवर राज ठाकरे काय म्हणाले?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सोमवारी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. 'माझा विषय वेगळा आहे. निवडणुकीवर बोलायचं असेल, तेव्हा मी निवडणुकीवर बोलेल'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

Ashadh Wari: वारकरी परंपरेत अनन्यसाधारण स्थान असलेल्या बाजीराव विहिरीत भाविकांची अलोट गर्दी|VIDEO

SCROLL FOR NEXT