Sameer Wankhede
Sameer Wankhede  Saam Tv
मुंबई/पुणे

Aryan Khan Case: मुंबईत 4 फ्लॅट, महागडी घड्याळ, परदेश प्रवास... आर्यनला पकडणाऱ्या समीर वानखेडेंच्या लक्झरी लाइफचा खुलासा

Shivani Tichkule

Sameer Wankhede News: शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करणारे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. समीर वानखेडे यांच्याशी संबंधित ठिकाणांवर सीबीआयनं छापे टाकले आहेत. मुंबई क्रूज प्रकरणाची चौकशी करणारे तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याशी संबंधित ठिकाणांवर सीबीआयनं छापे टाकले आहेत. (Latest Marathi News)

वानखेडे (Sameer Wankhede) यांनी कुटुंबासह अनेक परदेश दौरे केले होते. एवढेच नाही तर वानखेडे यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता आहे. अशी बाब एनसीबीच्या अहवालातून समोर आली आहे. समीर नावखेडे यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्याल आला आहे.

वानखेडे आणि इतर काही लोकांनी मिळून आर्यन खानकडे २५ कोटींची मागणी केल्याचे सीबीआयने आपल्या अहवालात म्हटले आहे. पैसे न दिल्याने आर्यनला ड्रग्जच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देण्यात आली असे देखील अहवालात म्हटले आहे.

दक्षता विभागाने तपास केला होता

एनसीबीच्या दक्षता विभागाने आर्यन खान प्रकरणाची चौकशीही केली होती. या अहवालात आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंट यांची नावे शेवटच्या क्षणी जोडण्यात आली होती, तर काही संशयितांची नावे वगळण्यात आली होती.

अहवालात म्हटले आहे की क्रूझवरील छाप्यादरम्यान एका संशयितावर एक रोलिंग पेपर सापडला होता परंतु त्याला सोडून देण्यात आले. तसेच ज्या रात्री आर्यन खानला एनसीबी (NCB) कार्यालयात आणण्यात आले, त्यावेळी सादर केलेला डीव्हीआर आणि हार्ड कॉपी यामध्ये तफावत आढळून आली.

5 वर्षात 6 देशांचा प्रवास

2017 ते 2021 या पाच वर्षात समीर वानखेडेने कुटुंबासोबत सहा परदेश दौरे केल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. या देशांमध्ये ब्रिटन, आयर्लंड, पोर्तुगाल, दक्षिण आफ्रिका आणि मालदीव यांचा समावेश आहे.

या अहवालात समीर वानखेडे यांची महागडी घड्याळे आणि इतर मालमत्तांचाही उल्लेख आहे, ज्या त्यांच्या उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा जास्त आहेत. यात रोलेक्स घड्याळाचाही समावेश आहे. त्यांचे मुंबईत चार फ्लॅट आणि वाशिममध्ये जमीन आहे.

उत्पन्नाचा गुप्त स्रोत

समीर वानखेडे यांनी गोरेगाव फ्लॅटसाठी 82.8 लाख रुपये खर्च केल्याचा दावा केला आहे, ज्याची किंमत 2.45 कोटी रुपये आहे. लग्नापूर्वी त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने 1.25 रुपयांना खरेदी केलेल्या फ्लॅटचाही उल्लेख आहे. वानखेडे आणि त्यांच्या पत्नीच्या आयकर रिटर्नमध्ये त्यांचे वार्षिक उत्पन्न 45,61,460 रुपये असल्याचे दिसून येते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! शतकी खेळीनं मुंबईच्या लल्लाटी विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

Esha Gupta च्या बोल्ड फोटोंची एकचं चर्चा, फोटो पाहून चाहते थक्क

Custard Apple Benefits : डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी सीताफळ उपयुक्त; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

SCROLL FOR NEXT