Shambhuraj Desai / Bhaskar Jadhav Saam TV
मुंबई/पुणे

विधानसभेत ठाकरे विरुद्ध शिंदे गटात वाद; मंत्री शंभूराज देसाईंना भास्कर जाधव म्हणाले, काव काव काय करतोय...

आज विधानसभेत शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटामधील आमदारांमध्ये वाद झाला तो वाद थेट वाडी ठेवण्यापर्यंत पोहचला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई: राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचाआजचा तिसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या कामकाजामध्ये विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये नेहमीच शाब्दीक चकमकी घडत असतात. कधी त्या आक्रमक तर कधी एकमेकांवर टोमणे मारले जातात. आजच्या कामकाजात देखील असाच एक वादविवाद शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटामधील आमदारांमध्ये झाला तो वाद थेट वाडी ठेवण्यापर्यंत पोहचला. (Maharashtra Monsoon Assembly Session)

ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेल्या थेट जनतेतून नगराध्यपद निवडीच्या बिलालावर आक्षेप घेतला. जाधव आपलं भाषण करत असताना शिंदे गटातील राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, (Shambhuraj Desai) काय काय असं म्हणू लागले, यावर भास्कर जाधव म्हणाले, 'काव काव काय करतोय, पितृपक्ष येत असेल म्हणून करत असेल.

पाहा व्हिडीओ -

त्यावर शंभूराजे देसाई म्हणाले तू काव काव करत आहेस. त्यावर भास्कर जाधव पुन्हा म्हणाले मी पितृपक्षात माझ्या आई-वडिलांना वाडी ठेवताना काव काव म्हणतो, नाहीतर मला तुमच्यासाठी वाडी ठेवण्याची वेळ आणू नका; असा इशाराच जाधव यांनी शंभूराज देसाई यांना दिला. त्यामुळे शिंदे गट विरुद्ध ठाकरे (Shinde vs Thackeray Group) गटामधील एकमेकांविरोधात असणारा रोष पुन्हा एकदा उफाळून आल्याचं चित्र आज विधानसभेत पाहायला मिळालं.

आपल्या भाषणामध्ये बोलताना जाधव यांनी थेट नगराध्यपद निवड प्रक्रियाला विरोध दर्शवताना ते म्हणाले, 'या बिलामध्ये नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव आणण्याची तरतूद कुठे आहे. नगराध्यक्ष चुकीचा आहे त्याला बोलावण्याचा अधिकार कुठे आहे? त्या नगराध्यक्षाने कसेही वागावे अशी माणसे निरंकुश होतात आणि ती होणार नाहीत असं देखील सांगत येत नाही.

मुख्यमंत्री तुम्ही हे विधेयक थांबवा, तुमच्याकडे बहुमत आहे त्यामुळे तुम्ही ते मंजूर करून घ्याल. 13 कोटी लोकसंख्येच्या राज्यात 56 ते 57 टक्के लोक शहरात राहतात. शहरात राहणाऱ्या लोकांचे जीवन नरक यातनेसारखे झाले आहे. नगरविकास विभागाची स्वतंत्र यंत्रणा काय आहे? त्यांचा स्वतंत्र अधिकारी वर्ग नाही असे प्रश्न जाधव यांनी उपस्थित केले.

तसंच हा कायदा पुन्हा एकदा तपासून बघा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाव शिवसेनेचे (Shivsena) घेता आणि सर्व निर्णय आणि कार्यक्रम भाजपचे राबवत आहेत. अरे तुम्ही घेतलेले निर्णय ते तुमच्याकडून बदलून घेत आहेत. ते सत्तेसाठी तडफडले होते त्यामुळे सावध व्हा तुम्हाला नाही त्यांनाही तुमची गरज आहे असं जाधव म्हणाले.

Edited By - Jagdsih Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT