Apologize for the statement that underestimates women Ruta Awhads appeal to Sujay Vikhe-Patil
Apologize for the statement that underestimates women Ruta Awhads appeal to Sujay Vikhe-Patil Saam TV
मुंबई/पुणे

Ruta Samant: "स्त्रीला कमी लेखणाऱ्या 'त्या' विधानाबद्दल माफी मागा" - ऋता आव्हाड यांचं सुजय विखे-पाटील यांना आवाहन...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: भाजपचे अहमदनगरचे खासदार सुजय विखे-पाटील यांनी महाविकास आघाडीवर टीका केली होती, ही टीका करत असताना त्यांनी शिवसेनेला (Shivsena) बायको आणि राष्ट्रवादीला (NCP) नवऱ्याची उपमा, तर कॉंग्रेसला (Congress) वऱ्हाड्यांची उपमा दिली. पण मविआवर केलेल्या टीकेमुळे त्यांनी स्त्रियांना कमी लेखलं असा आरोपा ऋता सामंत-आव्हाड (Ruta Samant - Awhad) यांनी केला आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या त्या पत्नी आहेत. (Apologize for the statement that underestimates women Ruta Awhads appeal to Sujay Vikhe-Patil)

हे देखील पहा -

नेमकं काय म्हणाले होते सुजय-विखे पाटील?

'मटा'च्या बातमीनुसार सुजय विखे-पाटील (Sujay-vikhe Patil) हे म्हणाले होते की, "महाविकास आघाडीमधील (MVA) राष्ट्रवादी कॉंग्रेस नवरा, शिवसेना बायको, तर कॉंग्रेस ही जेवणापुरते आलेले वऱ्हाडी आहेत. नवऱ्याने सवत आणू नये म्हणून बायको मुकपणे अन्याय सहन करीत आहे, तर कितीही अवहेलना केली, तरी वऱ्हाडी जेवणासाठी हापापले आहेत" अशा शब्दांत नगरचे खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी महाविकास आघाडीवर टीका केली होती.

खासदार सुजय विखे-पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेत मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी टीका केली आहे. ऋता आव्हाड म्हणाल्या की, "स्त्री ला कमी लेखणाऱ्या ह्या विधानाबद्दल माफी मागा" अशी मागणी केली आहे. यामुळे आता सुजय-विखे पाटील, हे माफी मागतात का हे पहावं लागेल.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: कल्याणमध्ये पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी निवडणूक आयोग सज्ज

Sambhajinagar Water Crisis : हर्सूल तलावाने गाठला तळ; केवळ अडीच टक्के साठा शिल्लक

Health Tips : तळलेलं तेल पुन्हा जेवणात वापरताय? तुम्हालाही होऊ शकतो कॅन्सर, ICMR च्या अभ्यासातून नवीन माहिती उघड

Sangli News: पाय घसरला, अनर्थ घडला, शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू; गावावर शोककळा

Jalgaon Gold-Silver Rate News : सोने-चांदीने पुन्हा उच्चांक गाठला!

SCROLL FOR NEXT