मुंबई- माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्याविरोधात आणखी एका प्रकरणात चौकशी गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) रविवारी (9 जानेवारी) वर्ग करण्यात आली आहे. सीआयडी (CID) याप्रकरणी सोमवारी (10 जानेवारी) अनुप डांगेचा जबाब नोंदवणार असल्याचेही वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. (Parambir Singh Latest News)
सुरवातीला या प्रकरणीचा चौकशी अँटी करप्शन ब्युरोकडून केली जात होती. मात्र, वर्षभरानंतरही कोणतीही प्रगती न झाल्यामुळे डांगे यांनी नाराजी व्यक्त करत डिसेंबर महिन्यात गृहमंत्री दिलीप वळसे यांना पत्र लिहून हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी केली होती.
हे देखील पहा -
पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी गेल्यावर्षी गृहविभागाचे अपर मुख्य सचिव यांना लिहिलेल्या पत्रात परमबीर सिंह यांचे पब मालकाशी असलेल्या संबंधांबाबत चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावेळी व्हॉट्सअॅप (Whatsapp) ग्रुपवर वरिष्ठांच्या विरोधात संदेश पाठवल्याप्रकरणी अनुप डांगे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
गावदेवी येथील डर्टी बन्स पब रात्री उशीरापर्यंत सूरू असल्यामुळे ते पब बंद करण्यासाठी गावदेवी पोलीस तेथे गेले होते. त्यावेळी पोलीस नाईक संतोष पवार यांना मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी डर्टी बन्स पबचा मालक जीतू नवलानी याला आरोपी म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यानंतर सिंह पोलीस आयुक्त झाल्यानंतर त्या प्रकरणाचा ठपका ठेवत डांगे यांची दक्षिण प्रादेशिक परिमंडळाच्या नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती.
त्यावेळी डांगे यांनी अतिरिक्त मुख्य सचिवांना पत्र लिहिले होते. या पत्रात डांगे यांनी जितू नवलानी याचे परमबीर सिंह यांच्याशी चांगले संबंध असल्याचे सांगून दबाव टाकण्याचे प्रयत्न केला होता. या घटनेनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक असलेल्या परमबीर सिंह यांनी याप्रकरणी कोणताही संबंध नसतानाही त्यांना एसीबी कार्यालयात बोलावले होते असा देखील आरोप डांगे यांनी केला आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.