Yashwant Jadhav  SaamTv
मुंबई/पुणे

Yashwant Jadhav: यशवंत जाधवांच्या आणखी 41 प्रॉपर्टी जप्त, 31 फ्लॅटसह हॉटेलचाही समावेश

यशवंत जाधवांच्या घरी आयकर विभागाचे छापे पडल्यानंतर कोरोनाकाळात त्यांनी जमवलेली कोट्यवधींची संपत्ती समोर आली आहे. 'मातोश्री' या कोडवर्डमुळे जाधवांच्या डायरीची बरीच चर्चा होत आहे.

सुरज सावंत

मुंबई : आयकर विभागाने मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राहिलेले शिवसेना (Shivsena) उपनेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) आणि त्यांच्या परिवाराच्या तब्बल ४१ मालमत्ता जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या ४१ मालमत्तांमध्ये बिल्कवडी चंबर बिल्डींगमधील ३१ फ्लॅट, भायखळा येथील इंपिरिकल क्राऊन हॉटेल आणि वांद्रे (Bandra) येथील एका फ्लॅटचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.

यशवंत जाधवांची डायरी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. जाधवांच्या घरी आयकरचे छापे पडल्यानंतर कोरोनाकाळात त्यांनी जमवलेली कोट्यवधींची संपत्ती समोर आली आहे. 'मातोश्री' या कोडवर्डमुळे जाधवांच्या डायरीची (Dairy) बरीच चर्चा होत आहे.

यशवंत जाधव यांनी महापालिकेत ज्या कंपन्यांना कंत्राट दिली त्याचीही आयकर विभागाने चौकशी केली आहे. या चौकशीत जाधव परिवाराने प्रधान कंपनीला कर्जाची परतफेड म्हणून दिलेले पैसे हे विविध मार्गांनी फिरवून कंत्राटदार बिमल अग्रवालच्या कंपनीत आल्याचं समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

यातील पैशांमधून यशवंत जाधव यांनी आपल्या सासुबाई सुनंदा मोहीते यांच्या नावावर भायखळा परिसरात इंपेरिकल क्राऊन नावाचं हॉटेलही खरेदी केल्याचं समोर आलं आहे. तर आयकर विभागाने यशवंत जाधव यांचा मेव्हणा आणि पुतण्यायांना चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावलं होतं. मात्र ते हजर राहिलेले नाहीत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Skin Care : थंडीत मुलायम त्वचेसाठी लावा 'हा' पदार्थ, कोरडेपणा मिनिटांत होईल दूर

Leopard Liefspan: बिबट्या किती वर्षे जगतो?

Post Office: पोस्टात जाण्याची झंझट संपली, आता मोबाईलवरूनच होणार सर्व कामं; Dak Seva 2.0 अ‍ॅप कसे वापरायचे?

Maharashtra Live News Update : नाशकात २० हजार कोटींपेक्षा जास्त कामे हाती घेतली आहेत - देवेंद्र फडणवीस

Shocking News : 'मी तुझ्या वडिलांचा खून ..' नवऱ्याची हत्या करून बॅगेत भरलं; बायकोनं थेट मुंबई गाठली अन्..

SCROLL FOR NEXT