Dhananjay Munde Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : मंत्रिपदाचा 'धनी' मुंडे नको; अंजली दमानियांकडून राजीनाम्याची मागणी, कारणही सांगितलं, VIDEO

Maharashtra Political News : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडे यांचं नाव समोर आल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरतेय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंडेंविरोधात आणखी एक पुरावा शेअर केलाय.

Tanmay Tillu

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडे यांचं नाव समोर आल्यानं त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरतेय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या प्रकरणी अधिक लक्ष घातलंय. दमानियांनी थेट पुरावे सादर करत मुंडेंच्या राजीनाम्यासाठी पिच्छा पुरवलाय. त्यामुळे धनंजय मुंडे अधिक संकटात सापडण्याची शक्यताय. याबाबत अंजली दमानियांनी काय ट्विट केलंय पाहूया.

'हे Office of Profit आहे. लाभार्थी. धनंजय मुंडे यांचा ताबडतोब राजीनामा घेण्यात यावा. वेंकटरश्वर इंडस्ट्रियल सरव्हिसेस नावाच्या कंपनीचे मेजोरिटी शेयरहोल्डर धनंजय मुंडे आणि राजश्री धनंजय मुंडे आहेत. यात आधी वाल्मिक कराड डायरेक्टर होते. आजही ते शेयरहोल्डर असून ही कंपनी fly ash विकते? Mahagenco ही कंपनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची wholly owned subsidiary आहे. असे असताना एक मंत्री त्या कंपनीतून आर्थिक लाभ कसा मिळवू शकतो? सोबत कंपनीचे Annexures जोडत आहे. यावर धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे यांची सही देखील आहे, असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

'असं असताना एक मंत्री त्या कंपनीतून आर्थिक लाभ कसा मिळवू शकतो? असा प्रश्न अंजली दमानिया यांनी उपस्थित केलाय. धनंजय मुंडे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. धनंजय मुंडे यांचा गेम ओव्हर झालाय. असा घणाघातही दमानिया यांनी केला. त्यामुळे येत्या काळात धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात जाणार असल्याचं दिसतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT