Breaking News: तब्बल आठ तासांनतर अनिल परब ED कार्यलयातून बाहेर  SaamTv
मुंबई/पुणे

Breaking News: तब्बल आठ तासांनतर अनिल परब ED कार्यलयातून बाहेर

तब्बल आठ तासांच्या ईडी चौकशीनंतर अनिल परब बाहेर आले त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: तब्बल आठ तासांच्या ईडी चौकशीनंतर अनिल परब बाहेर आले त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले मी फक्त ईडीच्या प्रश्नांना उत्तर देईल बाकी कोणाला उत्तरं देणार नाही. मला ईडीच्या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची मी उत्तरं दिली आहेत. त्यांचं समाधान झालं का नाही ते मी कसं सांगू असे अनिल परब म्हणाले. दरम्यान माजी मंत्री अनिल देशमुख आणि इतरांविरोधात नोंदवलेल्या मनी लाँडरिंग प्रकरणात महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब आज ईडी कार्यलयात हजर होते. शनिवारी ईडीने या प्रकरणी परब यांना दुसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (MVA) सरकारमध्ये परब यांच्याकडे संसदीय कामकाज विभाग आहे.

अनिल परब यांना मंगळवारी ईडीच्या दक्षिण मुंबईच्या बॅलार्ड इस्टेट परिसरातील कार्यालयासमोर हजर राहण्यास सांगितले होते. सकाळी ११ वाजता परब कार्यलयात हजर झाले होते. त्यानंतर तब्बल आठ तास त्यांची चौकशी झाली. कार्यालयाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तपास संस्थेच्या कार्यालयाकडे जाण्यापूर्वी परब यांनी पत्रकारांना सांगितले की, ते या प्रकरणाच्या तपासात ईडीला पूर्ण सहकार्य करतील. त्याचबरोबर परब म्हणाले, "मी आज ईडी अधिकाऱ्यांसमोर हजर आहे, त्यांनी मला कोणत्या हेतूने बोलावले आहे याची मला अजूनही माहिती नाही.

मी माझ्या मुली आणि दिवंगत शिवसेना प्रमुख (बाळासाहेब ठाकरे) यांची शपथ घेतो की मी काहीही चुकीचे केले नाही, म्हणून मी ईडी कार्यालयात जात आहे. अनिल परब यांना 31 ऑगस्टला हजर राहण्यसाठी सांगितले होते. तेव्हा त्यांनी हजर होण्यास नकार दिला होता आणि थोडा वेळ मागितला होता.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

SCROLL FOR NEXT