andolan to stop nilwande dam water in akole near nagar saam tv
मुंबई/पुणे

Nagar News : निळवंडे जलाशयाचा कालवा फोडण्याचा प्रयत्न पाेलिसांनी राेखला, आंदाेलकांनी जलसंपदाच्या अधिका-यांना खडसावले

खानापूर येथे आंदोलनस्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला हाेता.

Siddharth Latkar

- सचिन बनसाेडे

Akole News :

निळवंडे जलाशयाच्या डाव्या कालव्याचे पाणी बंद करण्याची मागणी करीत आज (मंगळवार) अकोले (akole) तालुक्यातील खानापूर शिवारात शेतक-यांनी आंदोलन छेडले. कालव्यातील पाणी गळतीमुळे शेकडो हेक्टर जमीन नापीक होत असल्याचा आरोप शेतक-यांनी केला आहे. माजी जिल्हा परिषद सदस्या सुनिता भांगरे (former zilla parishad member sunita bhangare) यांच्यासह असंख्य शेतक-यांनी आंदाेलनस्थळी आक्रमक पवित्रा घेतल्याने पाेलिसांनी आंदाेलकांना राेखले. (Maharashtra News)

यावेळी काही आंदोलकांकडून कालवा फोडण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी आंदोलकांना रोखल्यानंतर कालव्या जवळ आंदोलकांनी ठिय्या मांडला. त्यानंतर जलसंपदा विभागाचे अधिकारी आंदोलनस्थळी दाखल झाले.

यावेळी आंदाेलकांनी कालव्यांच क्रॉंक्रीटीकरणं आणि अस्तरीकरण करावे अशी प्रमुख मागणी केली. तसेच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अशी देखील मागणी करण्यात आली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळी आंदोलकांची अधिकाऱ्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात यश आले नाही. अखेर पाेलिसांच्या मध्यस्तीने आंदाेलकांत आणि अधिका-यांत चर्चा सुरू झाली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मालदिवपेक्षाही सुंदर! भारतातील 'हे' ठिकाण

UP Politics : 19 उपाध्यक्ष, 8 महामंत्री; निवडणुकीआधी राज्यातील भाजपमध्ये मोठा उलटफेर

Modi Cabinet Reshuffle: मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये IAS अधिकाऱ्याला मिळणार मंत्रिपद, कोण आहेत त्या महिला खासदार?

Maharashtra News Live Update: नाशिकमधील मक्याच्या शेडमध्ये आढळला विषारी कोब्रा

Krishi Thapanda: धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी आढळला ३३ वर्षीय मित्राचा मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरू

SCROLL FOR NEXT