मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे गटाने सावध पवित्रा घेतला आहे. ऋतुजा लटके यांच्यासोबत संदीप नाईक यांनी देखील फॉर्म भरला आहे. कोणत्याही कारणास्तव दगाफटका होऊ नये यामुळे फॉर्म भरण्यात आला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून दोन फॉर्म भरण्यात आले आहेत. प्रतिष्ठेच्या बनलेल्या राजकीय लढाईत कोणतीही चूक होऊ नये यासाठी ठाकरे गटाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आणि भाजपकडून आज शक्तीप्रदर्शन केलं गेलं. ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके तर भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. (Maharashtra News)
ऋतुजा लटकेंचा राजीनामा मुंबई महापालिकेकडून मंजूर
मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाननंतर अखेर मुंबई महापालिकेने शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा स्वीकारला. तसं पत्र सुद्धा लटके यांना महापालिकेकडून (BMC) देण्यात आलं आहे.
'१९८५ मध्ये जशी मशाल हाती घेऊन निवडणुकीत विजय मिळवला तसाच विजय या पोटनिवडणुकीत शिवसेनेचा विजय होईल, ऋतुजा लटके या १०० टक्के भरघोस मतांनी निवडून येईल, ही काळ्या दगड्यावरची भगवी रेष आहे', असंही शिवसैनिकांनी म्हटलं आहे.
दुसरीकडे, मुरजी पटेल यांच्यासोबत भाजचे दिग्गज नेते तसेच कार्यकर्ते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रवाना झाले आहे. भाजपकडूनही जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जात आहे. भाजप आमदार नितेश राणे हे सुद्धा मुरजी पटेल यांचा अर्ज भरण्यासाठी दाखल झाले आहेत. निवडणूकीत भाजपचाच विजय होईल, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.