Mumbai CBI
Mumbai CBI  Saam TV
मुंबई/पुणे

CBI ची मोठी कारवाई; एक लाखाची लाच घेताना अभियंत्याला केली अटक

सुरज सावंत

मुंबई: कंत्राटदाराने जमा केलेली सुरक्षा ठेव परत मिळवण्यासाठी एक लाखाची लाच घेताना सीबीआयने सोलापूरच्या युटिलिटी पॉवरटेक लिमिटेडच्या अभियंत्याला अटक केली आहे. CBI ने युटिलिटी पॉवर टेक लिमिटेड (खाजगी कंपनी) आणि नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राइझची (खाजगी कंपनी) आणि जॉइंट व्हेंचर कंपनीच्या अभियंत्याविरुद्ध तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार कंत्राटदाराने जमा केलेली सुरक्षा ठेव परत मिळवण्यासाठी सदर अभियंत्याने अडीच लाखांची मागणी केल्याचा आरोप या अभियंत्यावर आहे. या अभियंत्याने कंत्राटदाराला २.५० लाखाची लाच (Bribe) मागितली होती. शिवाय तडजोडी अंति ही रक्कम २ लाख ठरविण्यात आली होती. मात्र सदर रक्कम देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने सीबीआयकडे तक्रार केली.

पाहा व्हिडीओ -

कंत्राटदाराच्या तक्रारीनुसार सीबीआयने सापळा रचून लाचखोर अभियंत्याला पहिला हप्ता म्हणून १ लाख रुपये स्विकारताना CBI च्या अधिराऱ्यांनी रंगेहाथ पकडलं. शिवाय या प्रकरणी आरोपींच्या सोलापुरातील घराची झडती घेण्यात आली असून त्यामध्ये गुन्ह्याची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. आरोपीला सोलापूर येथील न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BCCI शी चर्चा! नको रे बाबा; कारवाईनंतर केकेआरचा गोलंदाज राणाची क्रिकेट बोर्डावर टीका

Unseasonal rain : चंद्रपूर जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा; चंद्रपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पूल गेला वाहून

EVM बिघाड, राडा, तुंबळ हाणामारी, व्हिडिओ आणि आरोपांच्या फैरी; तिसऱ्या टप्प्यात कुठं काय घडलं?

IPL 2024 DC vs RR : एकाच षटकात २ विकेट घेत कुलदीपने पालटली बाजू; घरच्या मैदानावर दिल्लीने राजस्थानचा २० धावांनी केला पराभव

Bhayandar News : सोसायटीचं फायर टेंडर दिलं नाही म्हणून अग्निशमनच्या अधिकाऱ्यांने केली बेदम मारहाण, खजिनदार गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT