Eknath Shinde Vs Raj Thackeray
Eknath Shinde Vs Raj Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

धमक्या, आर्थिक प्रलोभने दाखवत शिंदे गटाकडून पदाधिकाऱ्यांना फोडण्याचा प्रयत्न; मनसेचा गंभीर आरोप

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय गडदे -

मुंबई: शिंदे गटात येण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना धमक्या आणि विविध प्रलोभने दाखवली जात असल्याचा गंभीर आरोप मनसेचे (MNS) बोरीवली विभागाचे अध्यक्ष प्रसाद कुळापकर यांनी केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत मोठी फूट पडली असून या फुटीनंतर शिंदे गटाने मुंबईत आपल्या गटाचा जनाधार वाढवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार अनेक ठाकरे गटातील शिवसैनिक आणि पदाधिकारी देखील शिंदे गटात दाखल झाले आहेत.

पाहा व्हिडीओ -

अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिंदे गटावर खळबळजनक आरोप केला आहे. शिंदे गटाकडून मनसेचे कार्यकर्ते फोडण्यात येत असल्याचा आरोप झाला आहे मनसेचे बोरिवली विभाग अध्यक्ष प्रसाद कुळापकर यांनी हा गंभीर आरोप केला आहे.

कुळापकर यांनी सांगितलं की, शिंदे गटात येण्यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांना शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांकडून धमक्या देण्याबरोबरच विविध आमिष दाखवण्यात येत आहेत. शिवाय मनसे पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांना कार्यालयात बोलवून शिंदे गटांमध्ये तुम्हाला चांगली पदे देतो, आपल्याकडे सत्ता आहे सत्तेचाही लाभ मिळेल.

यासोबतच महापालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या मार्फत देखील शिंदे गटात सामील होण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप कुळापकर यांनी केला आहे. त्यामुळे आता पहिल्यापासून शिंदे गटाला पोषक भूमिका घेणाऱ्या मनसेवरच शिंदे गटाकडून कुरघोड्या सुरु केल्यामुळे राज ठाकरे (Raj Thackeray) काय भूमिका घेणार याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood Pressure कमी झाल्यावर काय खाणे योग्य ठरते

Jiya Shankar: सौंदर्य तुझं पाहून;'जिया' धडक जाये!!

Live Breaking News : सोलापूर जिल्ह्यातील भैरववाडी ग्रामपंचायतीने टाकला मतदानावर बहिष्कार

Pudina Sarbat: थंडगार! पुदिना सरबत बनविण्याची सोपी रेसिपी

Konkan Politics: किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गट भाजपमध्ये रंगला कलगीतुरा; अखेर उदय सामंतांनी सांगितला ठावठिकाणा

SCROLL FOR NEXT