'त्या' ट्वीट प्रकरणी माफी मागा अन्यथा...; अमृता फडणवीसांची नवाब मलिकांना नोटीस Saam Tv
मुंबई/पुणे

'त्या' ट्वीट प्रकरणी माफी मागा अन्यथा...; अमृता फडणवीसांची नवाब मलिकांना नोटीस

48 तासात मानहानीकारक, दिशाभूल करणारे ट्विट डिलिट करा आणि सार्वजनिकपणे माफी मागा

रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई

रामनाथ दवणे

मुंबई: गेल्या महिन्याभरापासून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) हे भाजपवर सातत्याने टीका करतायत. आरोप-प्रत्योरोपांच्या या वादात आता फडणवीस आणि मलिकांच्या कुटुंबीयांनीही उडी घेतली आहे. नवाब मलिकांचे जावई समीर खान (Sameer Khan Drugs Case) यांच्या घरात ड्रग्स सापडल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. हे आरोप फेटाळून लावत नवाब मलिकांची मुलगी निलोफर मलिक-खान (Nilofer Malik - Khan) यांनी देवेंद्र फडणवीसांना आता कायदेशीर नोटीस पाठवली होती. आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील नवाब मलिक यांना कादेशीर नोटिस पाठवली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची नबाव मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. 48 तासात मानहानीकारक, दिशाभूल करणारे ट्विट डिलिट करा आणि सार्वजनिकपणे माफी मागा अन्यथा मानहानीच्या खटल्याला सामोरे जा. तसेच मानहानीच्या खटल्यासोबतच फौजदारी कारवाईचाही नोटिशीतून इशारा देण्यात आला आहे. तर भादंविच्या कलम 499 आणि 500 अंतर्गत कारवाईचा इशारा दिला आहे.

अंडरवर्ल्ड कनेक्शन आणि ड्रग्ज प्रकरणी नवाब मलिक यांच्यावर यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या विरोधात मलिक यांनी आरोपांची माळच लावली आहे. देवेंद्र फडणवीस यांचेच ड्रग पेडलरशी संबंध असल्याचा दावा करणाऱ्या मलिक यांनी केला होता. तेव्हापासून मलिक विरुद्ध फडणवीस असा सामना रंगत आहे. तर मलिकांनी पत्रकार परिषद घेत फडणवीसांचे अंडरवर्ल्डशी असलेले कनेक्शन आहे . सर्व ड्रग्स चा धंधा फडणवीस त्यांच्यापासूनच सुरु होतो असे नवाब मलिक म्हणाले होते.अमृता फडणवीस यांनी देखील अलीकडेच मलिक यांच्यावर निशाणा साधला होता. बेनामी आणि काळी संपत्ती वाचवण्यासाठी नवाब मलिक लोकांवर आरोप करताहेत, असं अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Goregaon Crime: इमारतीत शिरून मोबाईल चोरीचा प्रयत्न; ५ जणांकडून बेदम मारहाण, हाणामारीत तरुणाचा मृत्यू

Wednesday Horoscope : दिवाळी पाडव्याचा आनंद द्विगुणीत होणार; महत्वाची कामे दुपारनंतर करा, अन्यथा...

Maharashtra Live News Update: ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात परतीच्या पावसाचा धुमाकूळ

Mumbai Port Authority: सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रकल्प रखडला; ‘मुंबई पोर्ट’कडून परवानगीसाठी विनंती

Ratnagiri Tourism : प्राचीन वास्तुकला अन् रेखी‍व शिल्पे, रत्नागिरीत गेल्यावर 'ही' लेणी पाहायला नक्की जा

SCROLL FOR NEXT