अमोल मिटकरींची राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया SaamTV
मुंबई/पुणे

...हा तर गांधींचा विजय आणि 'त्या' प्रवृत्तीचा पराभव; अमोल मिटकरींची राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया

"इथून पुढं सावरकरांची बदनामी सहन केली जाणार नाही."

जयेश गावंडे

अकोला : वीर सावरकर- द मॅन व्हू कॅन प्रिव्हेंट पार्टिशन Veer Savarkar - The Man Who Can Prevent Partition या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्या दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी महात्मा गांधीजींच्या सूचनेनुसारच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजांकडे दया याचिका दाखल केली होती असं वक्तव्यं केलं होतं. तसेच इथून पुढे सावरकरांची बदनामी सहन केली जाणार नसल्याचं ते म्हणाले होते. (Amol Mitkari's reaction to Rajnath Singh's statement)

हे देखील पहा -

राजनाथ सिंह Rajnath Singh यांच्या वक्तव्यावरती आमदार अमोल मिटकरी MLA Amol Mitkari यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मिटकरी 'म्हणाले त्यांच्या वक्तव्याला फारसे महत्व द्यायची गरज नाही. कारण यालाही गांधीच लागतात, गांधी कधी मेले नाहीत, गांधी कधी मरणार नाहीत. सावरकरांना आणि RSS लाही माफी मागण्यांसाठी गांधींचीच गरज लागली आहे. त्यामुळे हा गांधीजींचा Gandhiji विजय आहे. आणि सावरकर सारख्या प्रवृत्तीचा पराभव असल्याची टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे.

काय म्हणाले राजनाथ सिंह

दरम्यान ते या कार्यक्रमात म्हणाले सावरकरांसंबंधी आतापर्यंत खूप खोटं बोललं गेलं आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दोमोदर सावरकरांनी (Freedom Fighter Vinayak Domodar Savarkar) ब्रिटिशांकडे दया याचिका दाखल केल्याची घटना आपल्याला अनेक वेळा सांगितली. मात्र त्यांनी त्यांच्या सुटकेसाठी या याचिका दाखल केल्या नव्हत्या तर सर्वसाधारणपणे कुठल्याही कैद्याला दया याचिका दाखल करण्याचा अधिकार असतो. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे सावरकरांना दया याचिका दाखल करा, असं महात्मा गांधींनीच सांगितलं असल्याचही राजनाथ सिंग म्हणाले होते.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shifting Company Fraud : घराची शिफ्टिंग लय महागात पडली; शिफ्टिंग कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा सोन्यावर डल्ला

Maharashtrachi Hasyajatra: 'सगळं फिरलो, पण आपलं गावच बरं! हास्यजत्रेच्या मंचावर ओंकार भोजनेचा कमबॅक

Panhala History: सह्याद्रीच्या वैभवात महाराष्ट्राचे ऐतिहासिक रत्न, पन्हाळा गडाचा इतिहास

Weight Gain: झोपेच्या अभावामुळे वजन वाढते? जाणून घ्या कारण

Shaniwar Wada Namaz Row : भाजप खासदार मेधा कुलकर्णींना अटक होणार? पुण्यातील शनिवारवाडा प्रकरण तापलं

SCROLL FOR NEXT