Ketaki Chitale Latest News in Marathi
Ketaki Chitale Latest News in Marathi SAAM TV
मुंबई/पुणे

शरद पवारांबद्दल केतकी चितळेची आक्षेपार्ह पोस्ट, अमोल कोल्हे भडकले; म्हणाले, गरळ ओकण्याआधी...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधातील आक्षेपार्ह भाषेतील पोस्ट फेसबुकवर शेअर केल्यानं मराठी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) वादात सापडली आहे. तिच्यावर चहुबाजूने टीका होत आहे. दुसरीकडे तिच्याविरोधात ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. केतकीवर चहुबाजूने टीकेची झोड उठवली असतानाच, अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनीही तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. साहेबांबद्दल द्वेषानं गरळ ओकणाऱ्यांचा जाहीर निषेध, असं ट्विट कोल्हे यांनी केलं आहे.

शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविरोधातील आक्षेपार्ह भाषेतील पोस्ट अभिनेत्री केतकी चितळेनं फेसबुकवर केली आहे. नितीन भावे या व्यक्तीच्या नावाने असलेली पोस्ट तिने शेअर केल्यानंतर तिच्यावर टीका होत आहे. अमोल कोल्हेंनीही संताप व्यक्त केला आहे. साहेबांबद्दल द्वेषानं गरळ ओकणाऱ्यांचा जाहीर निषेध असं कोल्हे यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे. महाराष्ट्रच नव्हे, तर देशाच्या जडणघडणीत कृषी, सहकार, उद्योग, सामाजिक समतोल, महिला धोरण अशा अनेक क्षेत्रांत शरद पवार यांचं मोलाचं योगदान आहे, याकडेही कोल्हे यांनी या पोस्टमधून लक्ष वेधलं. विखारी आकसापोटी अशी गरळ ओकण्याआधी साहेबांनी महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्याचा स्वतःला अभिनेत्री म्हणवणाऱ्यांनी अभ्यास करावा, अशा शब्दांतही कोल्हे यांनी कान टोचले आहेत.

केतकीवर गुन्हा दाखल

शरद पवार यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह भाषेतील पोस्ट शेअर केल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेली अभिनेत्री केतकी चितळे हिच्या अडचणी वाढल्या आहेत. नितीन भावे नावाच्या व्यक्तीने लिहिलेली पोस्ट तिने आपल्या फेसबुक अकाउंटवरून शेअर केली होती. त्यानंतर तिच्याविरोधात संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी केतकीविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'ती' पोस्ट करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात

दोन दिवसांपूर्वी निखिल भामरे या तरुणानं शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केलं होतं. शरद पवार यांना धमकी देणारं ते ट्विट होतं. यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला होता. त्यांनी निषेध नोंदवला होता. तसंच या प्रकरणी चौकशीची मागणी केली होती. पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट करणं या तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. नाशिक ग्रामीणच्या दिंडोरी पोलिसांनी निखिलवर कारवाई केली आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याची चौकशी सुरू आहे. निखिलच्या मोबाइलमध्ये आणखी काही आक्षेपार्ह मजकूर आढळून आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs LSG, IPL 2024: लखनऊच्या नवाबांना हैदराबादी दणका! ट्रॅव्हिस हेडने घातला विजयाचा 'अभिषेक'

Uddhav Thackarey: जे अदानी- अंबानींना दिलं ते काढून घेणारं का? उद्धव ठाकरेंचा पीएम मोदींना सवाल

Today's Marathi News Live : मालदीवरून प्रकाश आंबेडकरांचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Maharashtra Politics : शरद पवारांचं एक विधान अन् राजकीय वर्तुळातून प्रतिक्रियांचा पाऊस, कोण काय म्हणालं?

13 लिटरची मोठी इंधन टाकी, स्पोर्टी लूक; Yamaha FZ S Fi दोन नवीन कलर ऑप्शनमध्ये लॉन्च

SCROLL FOR NEXT