MNS Student Wing
MNS Student Wing SaamTV
मुंबई/पुणे

MNS : अमित ठाकरेंची तरुणाईला साद; राज्यभरात मनसे विद्यार्थी सेनचे ५०० युनिट स्थापन करणार

सुरज सावंत

मुंबई: राज्यातल्या तरुणाईला आकर्षित करण्यासाठी मनसे (MNS) नेते अमित ठाकरे यांनी कंबर कसली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी राज्यातल्या तरुणाईला आकर्षित करण्यासाठी आठवड्याभरात मनसे विद्यार्थी सेनेचे १०० युनिट स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे. पहिल्या टप्यात ६६ युनिट स्थापन करणार असून मुंबईतील विविध महाविद्यालयात हे युनिट स्थापन करण्यात येणार आहे. (MNS Amit Thackeray Latest News)

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार अमित ठाकरे स्वत: १ ऑगस्ट आणि २ ऑगस्टला या युनिटचे उद्घाटन करणार आहेत. राज्यभरात ५०० युनिट स्थापन करून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तरुणांचा मोठा वर्ग आपल्याकडे करुन 'अमितछाप' सोडण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर मनविसे यंदा मुंबई सिनेटच्या सर्व १० जागा लढवणार असल्याची माहितीही मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरेंनी 'साम'ला दिली.

राज्याच्या राजकारणात सक्रिय होऊ पाहणारे राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हे सध्या संघटनात्मक बांधणीवर जास्त लक्षं देतायत. त्यासाठी ते राज्यातील अनेक भागांत फिरतायत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या महासंपर्कअभियानासाठी ते मनसे पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.

अमित ठाकरे मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या बांधणीवर विशेष लक्ष देत आहेत. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचा फायदा पक्षाला कसा होऊ शकेल यावर लक्ष केंद्रीत करत तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी मनसेचा गनिमीकावा सुरु आहे. त्यानुसार ते मनसे पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत त्यांना मार्गदर्शन करत आहेत. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पायावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना काही काळ विश्रांतीचा सल्ला दिला होता. राज ठाकरेंची प्रकृती आता उत्तम असून तेही पक्षाच्या कार्यक्रमांत सक्रिय होत आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Acidity Tips: वारंवार पित्त खवळंतय?हे घरगुती उपाय ठरतील रामबाण

Today's Marathi News Live : राम सातपुते यांची सोशल मीडियावर बदनामी; काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Voter Awareness Programme: मतदान करा हाे... मतदान करा..., मावळात वासुदेव करताहेत मतदारांची जागृती

Teeth Whitening Tips : पिवळेपणा जाऊन दात मोत्यासारखे चमकतील; आठवडाभर ट्राय करा 'या' पेस्ट

Nandurbar APMC Market: मिरचीचा ठसका! नंदुरबार बाजार समितीत विक्रमी आवक; ३५० कोटींची उलाढाल

SCROLL FOR NEXT