AMIT SHAH SLAMS RAHUL GANDHI saam tv
मुंबई/पुणे

अमित शाहांचा राहुल गांधींवर हल्लाबोल; म्हणाले, परदेश दौरे बंद करा, गावोगावी फिरा, तरच नंबर लागेल

Amit Shah Slams Rahul Gandhi Stop Foreign Trips: मावळमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. परदेश दौरे बंद करून गावोगावी फिरण्याचा सल्ला देत शाहांनी राहुल गांधींना टोला लगावला.

Omkar Sonawane

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मावळ येथे सहकार क्षेत्रातील मुद्द्यांवर भाष्य करताना काँग्रेसवर जोरदार टीका केली. तसेच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. भारताला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करून सत्ता मिळवता येणार नाही, असा टोला त्यांनी लगावला.

देशात सर्वप्रथम सहकार चळवळीची सुरुवात करणारी महाराष्ट्राची भूमी असल्याचे अमित शाह म्हणाले. स्वातंत्र्यानंतर तब्बल 70 वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारमध्ये स्वतंत्र सहकार मंत्रालयाची स्थापना केली. काँग्रेसच्या काळात शेतकरी केंद्राकडे स्वतंत्र सहकार मंत्रालयाची मागणी करत होते. मात्र, तत्कालीन सरकारने ही मागणी मान्य केली नाही. भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर स्वतंत्र सहकार मंत्रालयाची स्थापना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसच्या काळात अनेक साखर कारखाने बंद पडले होते. मात्र, आता हे कारखाने पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा दावा अमित शाह यांनी केला.

देशभरात भारत टॅक्सी सुरू होणार

टॅक्सी व्यवसायावर बोलताना अमित शाह यांनी देशभरात भारत टॅक्सी सुरू होणार असल्याची माहिती दिली. अनेक खासगी टॅक्सी कंपन्यांकडून चालकांचे शोषण केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. चालकांच्या हितासाठी भारत टॅक्सी महत्त्वाची ठरेल, असे त्यांनी सूचित केले.

राहुल गांधींना परदेश दौरे बंद करण्याचा सल्ला

दरम्यान, राहुल गांधी यांच्यावर टीका करताना अमित शाह म्हणाले की, राहुल गांधी यांनी भारताला बदनाम करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करू नये. परदेश दौरे बंद करून गावोगावी फिरावे, असा सल्लाही त्यांनी दिला. असे केल्यास कधीतरी त्यांचा नंबर लागू शकतो, असा टोला शाह यांनी लगावला. भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणी बदनाम करू शकते का? सत्तेची आकांक्षा अशा प्रकारे पूर्ण होऊ शकत नाही, असेही ते म्हणाले. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत अमित शाह यांनी या कृतीचा निषेध केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

No Onion Recipe : कांदा न वापरता बनवा 5 भाज्या, ज्या चवीसह आरोग्यालाही देतील फायदा

Health Tips : ३५ वर्षांखालील तरुणांमध्ये टाइप-२ मधुमेहाचा धोका वाढला; चुकीची जीवनशैली आणि आहार ठरतोय कारणीभूत

Maharashtra News Live Update: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट!

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर रोज सकाळी पाणी शिंपडल्याने काय होते?

Diabetes Diet : मधुमेह झाला म्हणून भात-पोळी सोडताय? ही चूक करू नका; योग्य आहाराने ठेवा साखर नियंत्रणात

SCROLL FOR NEXT