Eknath Shinde And Amit shah Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: अमित शहांच्या आदेशानंतर शिवसेनेच्या ३ मंत्र्यांना मिळणार डच्चू?, कोण आहेत हे मंत्री?

Eknath Shinde And Amit Shah: वादग्रस्त वक्तव्य आणि भ्रष्ट्राचाराचे आरोप असणाऱ्या माजी मंत्र्यांना महायुतीच्या नव्या सरकारमध्ये डच्चू मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Priya More

वैदेही काणेकर, मुंबई

राज्यामध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. उद्या राज्याचे नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत काही मंत्र्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. या शपथविधी सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुतीच्या नव्या सरकारमध्ये वादग्रस्त वक्तव्य आणि भ्रष्ट्राचाराचे आरोप असणाऱ्या माजी मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या ३ मंत्र्यांना नव्या सरकारच्या मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची शक्यता आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महायुतीच्या नेत्यांना नव्या मंत्री मंडळात भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या माजी मंत्र्यांचा समावेश न करण्याचे आदेश दिले आहेत. अशामध्ये शिवसेनेच्या ३ माजी मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना आमदारांची धाकधूक वाढली आहे.

शिवसेनेच्या या माजी मंत्र्यांना मिळू शकतो डच्चू -

१) संजय राठोड

माजी जलसंधारण मंत्री म्हणून सूमार कामगीरी. तसेच बंजारा समाजातील एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आले होते.

२) अब्दूल सत्तार -

माजी कृषी मंत्री आणि अल्पसंख्यांक मंत्री विभागांतर्गत कारभारात मोठा भ्रष्ट्राचार झाल्याचे अनेक आरोप करण्यात आलेत. या आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती ही नेमण्यात आली आहे.

३) तानाजी सावंत -

माजी आरोग्य मंत्री विभागात कामकाजात आर्थिक गैरव्यव्हाराचे आरोप करण्यात आलेत. तसेच पक्ष संघटनात्नक अनेक नाराजीच्या तक्रारी मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे अनेकवेळा आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT