Amit Shah-Devendra Fadnavis-Eknath shinde
Amit Shah-Devendra Fadnavis-Eknath shinde Saam Tv
मुंबई/पुणे

Amit Shah-Eknath Shinde Meeting: आता अमित शाह आणि एकनाथ शिंदेंची बंद दाराआड चर्चा, शाहांचं शिंदेंना मोठं आश्वासन

साम टिव्ही ब्युरो

सूरज मसूरकर

Mumbai News : राज्यात 2019च्या निवडणुकीआधी उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली होती. त्यानंतर बैठकीत काय झालं काय नाही झालं यावर बराच काळ चर्चा झाली.

यानंतर मोठी उलथापालथ राज्याच्या राजकारणात झाली. आज देखील अशीच बंद दाराआड चर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्यात झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

राज्यातील आगामी सर्व निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात लढवल्या जातील असं आश्वासन अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याची माहिती आहे. भाजप आणि शिवसेना युतीची धुरा आगामी निवडणुकीत एकनाथ शिंदेंकडे असणार असल्याचं समजतंय. याबाबत सर्वाचं एकमत झाल्याचीही माहिती समोर येत आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरु होत्या. एकनाथ शिंदे यांना राजीनामा देण्यासाठी कधीही तयार राहण्याच्या सूचना भाजप नेतृत्वाकडून मिळाल्याच्याही चर्चा राज्यात होत्या. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याचं बोललं जात होतं. याच पार्श्वभूमीवर ही आजची बैठक झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. (Latest Marathi News)

अमित शाह खासगी कार्यक्रमानिमित्त मुंबई दौऱ्यावर आहेत. अमित शहा हे स्थानिक आमदार पराग अळवणी यांच्या घरी आले आहेत. तेथे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्यात ही चर्चा झाल्याची माहिती आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Avinash Jadhav: मतांसाठी मराठी आणि गुजरातीचा वाद निर्माण केला; मनसेची ठाकरे गटावर टीका

Maharashatra Election: निवडणूक तोंडावर,ठाकरेंचा शिलेदार तडीपार; सुधाकर बडगुजरांना तडीपारीची नोटीस

Maharashtra Election: महायुतीत दादाविरुद्ध दादा संघर्ष कायम; चंद्रकांत पाटलांकडून पवारांना संपवण्याची भाषा

Maharashtra Politics 2024 : कोल्हापूरच्या विजयासाठी लाखांच्या पैजा; वाढलेल्या टक्क्यानं वाढवली उत्सुकता

PBKS vs RCB: 'विराट' वादळानं RCB चा विजयी चौकार; पंजाब प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर; या संघांचं टेन्शन वाढलं

SCROLL FOR NEXT