NCP Sharad Pawar faction demands drought-hit status for Ambernath taluka saam tv
मुंबई/पुणे

५०० रुपयांचा चष्मा घातल्याशिवाय दिसत नाहीत; अंबरनाथचे तहसीलदार म्हणजे ‘मिस्टर इंडिया, बैलगाडीसह थेट कार्यालयात धडक

Bullock cart protest at Ambernath Tehsil Office: अंबरनाथ तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.

Mayuresh Kadav, Omkar Sonawane

अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी हे मिस्टर इंडिया आहेत. पाचशे रुपयांचा चष्मा घातल्याशिवाय ते दिसत नाहीत' अशा तिखट शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी टीका केली. अंबरनाथ तालुक्याला दुष्काळग्रस्त घोषित करा या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आक्रमक झाला आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी राष्ट्रवादीच्यावतीने अंबरनाथच्या तहसील कार्यालयावर थेट बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. मात्र, तहसीलदार गैरजर असल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाच्या आवारातच बैलजोडी बांधत जोरदार घोषणाबाजीही केली. यंदा सप्टेंबर महिन्यातच पावसानं ओढ दिल्यानं अंबरनाथ तालुक्यातील भातशेती संपल्यात जमा आहे. तर खरिपाच्या हंगामातला भाजीपालाही हातचा निघून गेला आहे. त्यामुळे अंबरनाथ तालुक्याला दुष्काळग्रस्त घोषित करावं या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला होता.

तीन दिवसांपूर्वी याबाबतचं निवेदन देऊनही तहसीलदार अमित पुरी गैरहजर राहिले. त्यामुळे राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांना संताप अनावर झाला. तहसीलदार अमित पुरी हे सर्वात निष्क्रिय तहसीलदार असल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील अविनाश देशमुख यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लोकल प्रवाशांसाठी सर्वात मोठी बातमी! 'या' नव्या मार्गावर धावणार दररोज ५० लोकल; प्रवासाचा वेळ अर्धा होणार?

Maharashtra News Live Update: उद्धव ठाकरे गटावर निलेश राणेंची टीका; दोन ठाकरे एकत्र आले तरी राजकीय फरक पडणार नाही

Actor Death: प्रसिद्ध अभिनेत्याचे ३२ व्या वर्षी निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

Tea : गरमागरम चहा पिण्याची सवय पडेल महागात, ३ दुष्परिणाम वाचून चहा पिणेच सोडाल

Best fridge temperature: ऑक्टोबरच्या उकाड्यात फ्रिजचं तापमान किती डिग्रीवर ठेवावं?

SCROLL FOR NEXT