AMBERNATH SHOCKER: YOUTH ATTACKED OVER SUSPECTED LOVE AFFAIR, FIVE BOOKED FOR ATTEMPT TO MURDER Saam Tv
मुंबई/पुणे

Ambernath : अंबरनाथमध्ये तरुणावर हल्ला, पुतणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून काकाने काढला राग; ५ आरोपींवर गुन्हा

Ambernath Crime News : अंबरनाथच्या पालेगाव परिसरात पुतणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल.

Alisha Khedekar

  • अंबरनाथच्या पालेगाव परिसरात तरुणावर जीवघेणा हल्ला

  • पुतणीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून हल्ला

  • तरुणाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू

  • पाच जणांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

अजय दुधाणे, अंबरनाथ

अंबरनाथच्या पालेगाव परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे. पुतणीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून मुलीच्या चुलत्याने एका तरुणावर जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी पाच जणांविरोधात हत्येच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. ओम खोरे असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओम खोरे याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय त्याच परिसरात राहणाऱ्या संदीप गवळी याला होता. संबंधित तरुणी ही संदीप गवळी याची पुतणी असल्याचे सांगितले जात आहे. याच संशयातून संदीप गवळी याने आपल्या काही साथीदारांसोबत मिळून ओमवर हल्ला केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ जून रोजी रात्री सुमारे १०.१५ वाजण्याच्या सुमारास ओम खोरे हा पालेगाव परिसरातील सोल फिटनेस जिमसमोर उभा होता. त्यावेळी संदीप गवळी याने रवी परमार, नयन मढवी, सचिन पाटील आणि राज देसेकर या साथीदारांच्या मदतीने त्याचे कथित अपहरण केले. त्यानंतर आरोपींनी ओमला जबरदस्तीने एका मैदानात नेले.

तेथे आरोपींनी लोखंडी रॉड, बांबू आणि चाकूसारख्या हत्यारांनी ओमला बेदम मारहाण केली. या हल्ल्यात ओम गंभीर जखमी झाला. मारहाणीनंतर आरोपींनी त्याला जखमी अवस्थेत तिथेच सोडून घटनास्थळावरून पळ काढला. स्थानिकांच्या मदतीने ओमला तातडीने उपचारासाठी उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला मुंबईतील केईएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर तेथे उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी तपास सुरू केला. प्राथमिक चौकशीनंतर संदीप गवळी आणि त्याच्या चार साथीदारांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल. या घटनेमुळे पालेगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ketan Agarwal Case: केतन अग्रवालच्या हत्येआधीचा धक्कादायक व्हिडीओ आला समोर, सिया अन् चेतन होते सोबत

संजय दिना पाटील यांची पत्रकारांना शिवीगाळ; मुख्यमंत्री काय म्हणाले? VIDEO

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात पावसाचे आगमन

यंदा वटपौर्णिमेला नेसा पैठणी साड्या, हे आहेत लेटेस्ट 5 पॅटर्न

Shocking : मैत्रीनं केला घात! गोड बोलून ९वीच्या विद्यार्थिनीला बाथरूममध्ये नेलं, गळा दाबला नंतर चाकू भोसकला

SCROLL FOR NEXT