Ambernath flyover accident: CCTV captures the moment a speeding car hit three bikers, leaving four dead and several injured. saam tv
मुंबई/पुणे

Ambernath Accident: अंबरनाथमध्ये भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू, अपघातग्रस्त कारमध्ये शिवसेनेच्या महिला उमेदवार

Ambernath Fatal Accident Update: अंबरनाथ पूर्व-पश्चिम उड्डाणपुलावर भीषण अपघात झालाय. यात दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झालाय. अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. अपघातग्रस्त कार कोणाची आहे, याची माहिती आता समोर आलीय.

Bharat Jadhav

  • अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत.

  • अपघातग्रस्त कार शिवसेनेच्या एका महिला उमेदवाराची असल्याचे सांगण्यात येत आहे.

  • अपघातात ४ जणांचा मृत्यू झालाय.

अजय दुधाणे, साम प्रतिनिधी

अंबरनाथ पूर्व–पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलावर आज पहाटे भीषण अपघात झाला. वेगावर नियंत्रण सुटलेल्या कारने तीन मोटरसायकलस्वारांना जबर धडक देत चिरडले. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. संपूर्ण अपघाताचा थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.

अपघातात कारचा ताबा चालकाकडून सुटल्याने वाहनाने उड्डाणपुलावर अनियंत्रितपणे अनेकांना धडक दिली. मृतांमध्ये शैलेश जाधव, चंद्रकांत अनारके, सुमित चैलानी यांचा समावेश असून, कारचा काढता ड्रायव्हर लक्ष्मण शिंदे यांचाही जागीच मृत्यू झाला आहे.

जखमींमध्ये अभिषेक चव्हाण, अमित चव्हाण यांच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिवसेना (शिंदे गट) उमेदवार किरण चौबे या देखील या कारमध्ये होत्या आणि त्या गंभीर जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जखमींमध्ये अभिषेक चव्हाण, अमित चव्हाण यांच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिवसेना (शिंदे गट) उमेदवार किरण चौबे या देखील या कारमध्ये होत्या आणि त्या गंभीर जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS Transfers: पुणे महापालिकेतील उपायुक्तांच्या पुन्हा बदल्या; अधिकारी धास्तावले

भाजपचा क्लीन स्वीप? १०० पेक्षा अधिक नगरसेवकांनी बिनविरोध उधळला विजयाचा गुलाल, स्थानिक पातळीवर कमळ फुललं |VIDEO

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीवर कारवाईचा बडगा? KYC मुळे सरकारी लाडकीचा भांडाफोड

Horoscope: 'या' ५ राशींच्या नशिबाचे चमकतील तारे; यशासह धनलाभाचा योग, जाणून तुमचं राशीभविष्य

पवार-ठाकरेंना हवी मनसे? काँग्रेसला राज ठाकरे नकोसे?

SCROLL FOR NEXT