डम्पिंग ग्राऊंड बंद झाल्याने अंबरनाथकरांची धुरातून सुटका अजय दुधाणे
मुंबई/पुणे

डम्पिंग ग्राऊंड बंद झाल्याने अंबरनाथकरांची धुरातून सुटका

मोरीवली मधील डम्पिंग आता चिखलोलीत

अजय दुधाणे

अंबरनाथ : अंबरनाथकरांसाठी Ambernath एक आनंदाची बातमी असून ,अंबरनाथकर आता मोकळा श्वास inspiration घेणार आहेत. कारण डम्पिंगच्या Dumping धुरातून अंबरनाथकरांची सुटका झाली आहे. अंबरनाथ मधील मोरीवली पाडा Morivali Pada भागात असलेलं, अनधिकृत डम्पिंग ग्राउंड आता कायमचं बंद करण्यात आले आहे, आता हे डम्पिंग चिखलोली Chikhloli गावातील सर्व्हे क्रमांक १३२ वर स्थलांतरित करण्यात आले आहे.

अंबरनाथ शहरात मोरीवली पाडा या ठिकाणी ७० वर्षांपूर्वी शहरातील कचरा एका खासगी जागेवर टाकायला सुरुवात करण्यात आली होती. या ७० वर्षाच्या कालावधी मध्ये मोरीवली भागात वस्ती वाढली आहे. लहान मोठी अनेक नवीन गृहसंकुलं या ठिकाणी उभारण्यात आली. विकासकांनी डम्पिंग ग्राउंड ६ महिन्यात बंद होईल,अशा भूल थापा देत घरं विकली. मात्र, डम्पिंग काही बंद होत नव्हते.

हे देखील पहा-

डम्पिंग ग्राउंडला अनेक वेळा लागलेल्या आगी, आणि डम्पिंगची दुर्गंधी यामुळे या भागात लाखो रुपयांची घरं घेऊन राहायला आलेल्या नागरिकांना अक्षरशः मोकळा श्वास घेणे देखील कठीण होऊन बसले होते. त्यामुळे अनेक वेळा भागातले बिल्डर, नागरिकांनी या डम्पिंग विरोधात आंदोलने केली. मात्र, काही झाले नाही आणि योगा- योगाने डम्पिंग ग्राउंड समोरच नवीन न्यायालय उभे करण्यात येत आहे. त्याचे बांधकाम पूर्ण देखील होत आहे.

न्यायालयाच्या समोरच अनधिकृत डम्पिंग हे समीकरण न्यायालयालाही court पटले नाही आणि न्यायालयाने अंबरनाथ पालिकेकडे याबाबतचा पाठपुरावा केला. अखेर जे अनेक आंदोलने आणि अनेक उपोषणा नंतर झाले नाही. ते न्यायालयाच्या दणक्यानंतर झाले आहे. यामुळे अखेर हे डम्पिंग बंद करण्याचा निर्णय अंबरनाथ पालिकेला घेणं भाग पडले आहे. आता हे डम्पिंग चिखलोलीत गांडूळ खत प्रकल्पाजवळ सर्व्हे क्रमांक १३२ मध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे.

ज्या सर्व्हे क्रमांक १३२ वर गांडूळ खत प्रकल्पाजवळ हे नवे डम्पिंग सुरू करण्यात येत आहे. तिथून जवळच वडवली गाव असून, तिथेही नव्याने गृहसंकुलं उभी राहिली आहेत. यामुळे सुरुवातीला या प्रकल्पाला स्थानिक रहिवासी आणि बदलापूरच्या राजकीय पदाधिकाऱ्यांनी विरोध केला होता. मात्र, स्वतः नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतल्याने हा विरोध मावळला. आता मोरीवली मधील डम्पिंग बंद झाल्यानंतर चिखलोलीच्या गांडूळ खत प्रकल्पाजवळ तात्पुरत्या स्वरूपात कचरा टाकला जाणार आहे.

शिवाय याच ठिकाणी एमएमआरडीएच्या साहाय्याने स्पेनच्या कंपनीकडून कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारला जाणार आहे. २०२३ सालच्या सुरुवातीला हा प्रकल्प वापरात येणार आहे. मात्र, या सगळ्यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे मोरीवली पाडा भागातला धूर, दुर्गंधी हा त्रास आता कायमचा दूर होणार आहे. त्यामुळे आता लाखो रुपयांची घरं घेऊन, अंबरनाथ शहरात राहायला आलेल्या नागरिकांना खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेता येणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

SCROLL FOR NEXT