Ambernath breaking  
मुंबई/पुणे

BJP : अंबरनाथमध्ये भाजप कार्यालयावर हल्ला, कर्मचाऱ्यावर तलवारीने वार, घटना सीसीटीव्हीत कैद

Ambernath breaking : अंबरनाथमध्ये भाजप माजी नगरसेवक रोहित महाडिक यांच्या कार्यालयावर अज्ञात टोळक्याचा तलवारीने हल्ला. कर्मचारी जखमी. सीसीटीव्हीत कैद झालेली घटना. पोलीस तपास सुरु.

Namdeo Kumbhar

अजय दुधाणे

Ambernath BJP ex-corporator office vandalism news : अंबरनाथमध्ये भाजपाच्या माजी नगरसेवकाचं ऑफिस फोडल्याची घटना घडली. अज्ञांनी मध्यरात्री हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. हातात तलवारी घेतलेल्या अज्ञात हल्लेखोरांकडून तोडफोड करण्यात आली आहे. १० ते १२ जणांच्या अज्ञात टोळक्यांनी कार्यालयात धुडगूस घातला. ऑफिसमधील कर्मचाऱ्यावरही तलवारीने हल्ला केल्याची घटना घडली. हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत झाली कैद झाली.

अंबरनाथमधील भाजपाचे माजी नगरसेवक रोहित राजू महाडिक यांच्या ऑफिसवर अज्ञात हल्लेखोरांनी शनिवारी रात्री हातात तलवारी घेऊन हल्ला केला. यामध्ये ऑफिसचं मोठं नुकसान झालं असून ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यावर देखील तलवारीने हल्ला करण्यात आला आहे.

अंबरनाथमधील भाजपाचे माजी नगरसेवक रोहित राजू महाडिक यांचं अंबरनाथ पूर्वेच्या बी केबिन रोडवरील स्वानंद शॉपिंग कॉम्प्लेक्स शेजारी कार्यालय आहे. या कार्यालयात शनिवारी रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास अचानक तोंडाला रुमाल बांधलेले आणि हातात तलवारी घेतलेले १० ते १२ हल्लेखोर आले. त्यांनी ऑफिसच्या काचा तलवारीने फोडत ऑफिसमध्ये घुसून ऑफिसमध्ये काम करणाऱ्या तरुणावर देखील तलवारीने हल्ला चढवला.

तसंच ऑफिसमधील खुर्च्यांचीही तलवारीने वार करत नासधूस केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. अवघ्या २३ सेकंदात हल्ला चढवून हे हल्लेखोर तिथून पसार झाले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सध्या हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

SCROLL FOR NEXT