Harshwardhan Sapkal Saam
मुंबई/पुणे

Ambarnath: मोठी बातमी! अंबरनाथमध्ये भाजपसोबत युती करणाऱ्या काँग्रेसच्या १२ नगरसेवकांचं निलंबन, उलटफेर होणार?

Harshwardhan Sapkal: अंबरनाथ नगरपरिषदेमध्ये विजयी झालेल्या १२ नगरसेवकांचे निलंबन करण्यात आले आहे. भाजपसोबत युती केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्ध सपकाळ यांनी ही कारवाई केली.

Priya More

Summary -

  • अंबरनाथ नगरपरिषदेत भाजप–काँग्रेस युती झाल्याने राजकारण तापले

  • काँग्रेस-भाजपने युती करत शिवसेना शिंदेगटाला सत्तेबाहेर ठेवलं

  • या युतीनंतर काँग्रेसच्या १२ नगरसेवकांचे निलंबन करण्यात आले

  • ब्लॉक काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली

मंगळवारी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली होती. अंबरनाथ नगरपरिषदेमध्ये भाजप आणि काँग्रेस एकत्रित आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. अंबरनाथ नगरपरिषदेमध्ये भाजपने काँग्रेससोबत हातमिळवी करत शिवसेना शिंदेगटाला सत्तेतून बाहेर ठेवले. काँग्रेसमुक्त भारतच्या घोषणा देणाऱ्या अंबरनाथमध्ये भाजपसोबत हातमिळवणी केल्यानंतर काँग्रेस पक्षाने मोठा निर्णय घेतला. काँग्रेसने पक्षाच्या १२ नगरसेवकांचे निलंबन केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजप, काँग्रेस आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीने मिळवून अंबरनाथ विकास आघाडीची स्थापना केली. भाजप आणि काँग्रेस एकत्रित आल्यानंतर काँग्रेस पक्षाकडून नगरसेवकांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. अंबरनाथच्या प्रदीप पाटील यांच्यासह १२ नगरसेवकांचे कॅाग्रेसमधून निलंबन करण्यात आले. काँग्रेस चिन्हावर निवडून आलेल्या १२ सदस्यांनीअंबरनाथ नगरपालिकेत भाजपासोबत परस्पर युती केली होती. भाजपासोबत युतीची घटना पक्षशिस्तीचा भंग करणारी असल्याने काँग्रेसची या सर्व सदस्यांविरोधात कारवाई केली.

काँग्रेस पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्या सर्व नगरसेवकांवर पक्षातून निलंबनाची कारवाई करण्यात आली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार अंबरनाथची ब्लॅाक काँग्रेस कार्यकारीणी बरखास्त करण्यात आली आहे. या निर्णयामुळे आता अंबरनाथ नगरपरिषदेत फेर निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या कारवाईमध्ये अंबरनाथमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली. याची फक्त अंबरनाथमध्ये नाही तर संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs GT IPL 2026 Final: कोण जिंकणार आयपीएल २०२६चा कप? RCB आणि GT मधील महसंग्राम कुठे, केव्हा आणि कसा पहाल?

Rules Change June 2026: ATM चा व्यवहार ते एलपीजी, १ जूनपासून कोणकोणते बदल होणार?

Maharashtra News Live Update: परभणी हिंगोली विधान परिषद निवडणूकीसाठी महाविकास आघाडीतील उमेदवारी घोषित

वयाची पन्नाशी ओलांडली तरी दिसते इतकी सुंदर; 'धक धक गर्ल'चं गुलाबी सौंदर्य पाहून उडेल झोप

Panhala Fort : कोल्हापूरजवळील ऐतिहासिक रत्न! पन्हाळा किल्ल्याचे जुने नाव काय?

SCROLL FOR NEXT