Ambadas Danve Vs Prasad Lad Saam Tv
मुंबई/पुणे

VIDEO: गांधी, हिंदुत्व आणि शिव्या; विधान परिषदेत आज कशावरून वादंग उठला?

Maharashtra Monsoon Session: पावसाळी अधिवेशनात चौथ्या दिवशी विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे बोलताना त्यांचा तोल सुटला आणि सभागृहात प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली.

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

पावसाळी अधिवेशनात चौथ्या दिवशी अत्यंत वादळी ठरला. क्रिकेट वर्ल्ड कपच्या बीसीसीआय अध्यक्ष आशिष शेलार यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे बोलताना त्यांचा तोल सुटला आणि सभागृहात प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली. तसेच त्याला प्रसाद लाड यांनीही शिवी देतच उत्तर दिलं. त्यामुळे विधानपरिषदेमध्ये एकच गोंधळ झाला.

विधान परिषदेच्या चौथ्या दिवशी 108 ॲम्बुलन्स , मुंबई महानगरपालिका कॉन्ट्रॅक्ट रद्द अशा अनेक महत्त्वाच्या बाबींवर चर्चा सुरू होती. त्यात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात एक मत दिसून आलं. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांच्या एकमतमुळे विधान परिषदेतील संस्कार प्रकर्षाने दिसून आले. मात्र त्यानंतर सत्ताधारी पक्षातील प्रसाद लाड यांनी राहुल गांधी यांनी लोकसभेत केलेले हिंदुत्वाच्या विधानावरून विरोधकांना करण्याचा प्रयत्न केला.

राहुल गांधी हाय हायच्या घोषणा करतच विरोधात असलेल्या उद्धव ठाकरे गटातील नेत्यांना हिंदुत्वा संदर्भात खोचक विधान करत त्यांना अडचणीत पकडण्याचा प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांनी प्रयत्न केला. विधान परिषदेतील हा गोंधळ इतका वाढला की, ५ मिनिटांसाठी सभापतींना सभागृह तहकूब करावं लागलं. त्यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे सभागृहात आल्यावर पुन्हा त्याच मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये गोंधळ दिसून आला. पुन्हा उपसभापती यांना दहा मिनिटांसाठी सभागृह तहकूब करावा लागलं.

दरम्यान, सभागृहामध्ये प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांनी अंबादास दानवे तसेच उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना डिवचण्याचा प्रयत्न केला. तसेच विंगेत येऊन प्रसाद लाड यांनी बेंच वाजवत राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणा दिली. पुन्हा सभागृह सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेता अंबादास दानवे जेव्हा प्रस्ताव मांडण्यासाठी उभे राहिले, त्यावेळेस प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी पुन्हा राहुल गांधी यांच्या मुद्द्यावरून आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे गटाला घेरलं. यावेळी उपसभापतींच्या समोरच प्रसाद लाड यांनी हातवारे करत बोट दाखवत अंबादास दानवे यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर अंबादास दानवे यांचा शाब्दिक तोल गेला. बोट दाखवत आरोप करत असल्यामुळे अंबादास दानवे यांनी रागाच्या भरात तसे न करण्यासंदर्भात सांगितले. त्याचप्रमाणे त्यांचा तोल जाऊन त्यांनी भर सभागृहात शिवीगाळ केली.

त्यावर प्रसाद लाड यांनी देखील शिवीगाळ करत दानवे यांना प्रत्युत्तर दिलं. हा सर्व प्रकार उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासमोरच झाला. यावेळी सभागृहात महिला सदस्य देखील उपस्थित होत्या. त्यांच्यासमोरच सभागृहातील दोन महत्त्वाचे नेते एकमेकांना आई-वाहिनीवरून शिवीगाळ करत होते. हा गोंधळ इतका वाढला की, सभागृह पूर्ण दिवसासाठी तहकूब करावा लागला.

यावर बोलताना प्रसाद लाड आणि प्रवीण अधिकारी यांनी अंबादास दानवे यांच्यावर कारवाई करायला हवी, अशी मागणी केली. त्याचप्रमाणे हिंदुत्वाचा मुद्दा त्यांना टोचला असल्याचे आरोपही या दोन नेत्यांनी केला. त्यानंतर अंबादास दानवे यांनी देखील प्रतिक्रिया देताना मी शिवसैनिक आहे, मला यांनी हिंदुत्व शिकवू नये, या भाषेत खरमरीत टीका केली. या प्रकरणात आता उपसभापती नीलम गोऱ्हे दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांवर कोणती कारवाई करतात हे मात्र पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

DY chandrachud : एखादा पक्ष ठरवणार का, सुप्रीम कोर्टात निर्णय काय घ्यायचा? ठाकरे गटाच्या आरोपांना चंद्रचूड यांचं प्रत्युत्तर

Saim Ayub: वनडे क्रिकेटच्या इतिहासात जे कोणालाच जमलं नाही, ते सॅम अयूबने करुन दाखवलं

SCROLL FOR NEXT