priyanka umargekar, alandi, pimpri chinchwad, Alandi Police saam tv
मुंबई/पुणे

प्रियांका उमरगेकरच्या मृत्यूप्रकरणी पती, सास-यांसह माजी नगराध्यक्षांवर गुन्हा दाखल

आळंदी पाेलीसांनी दाखल केला गुन्हा.

रोहिदास गाडगे

आळंदी : आळंदी (alandi) येथील प्रियांका अभिषेक उमरगेकर (priyanka umargekar) यांच्या मृत्यूप्रकरणी आळंदी पाेलीसांनी (police) पतीसह सासू सास-यांवर गुन्हा दाखल केला आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पाेलीसांनी ही कारवाई केली आहे. (priyanka umargekar latest marathi news)

प्रियांका उमरगेकर (priyanka abhishek umargekar) यांनी राहत्या घरी गळफस लावून आत्यहत्या केल्याची घटना नुकतीच घडली हाेती. प्रियांका या पिंपरी चिंचवडच्या माजी नगरसेविका कमल घोलप यांची कन्या हाेत. त्यांचा विवाह आळंदी पालिकेच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांचा मुलगा अभिषेक याच्याशी झाला हाेता.

या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी पाेलीसांत उमरगेकर यांच्या कुटुंबियांच्या विराेधात तक्रार नाेंदवली. या तक्रारीत सासरच्यांचा छळ, अपमानास्पद वागणुक आदी त्रासामुळे प्रियाकांने आत्महत्या केल्याचे म्हटलं आहे. या तक्रारीनूसार पाेलीसांनी (कलम 304 (ब), 306, 498 (ब), 34) आळंदीच्या भाजपच्या माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, अशोक उमरगेकर, प्रियांकाचे पती अभिषेक उमरगेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime Branch: वसुली पोलीस! पुणे पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या ४ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन

Bihar Election Result: २२७१ लोकांचा विश्वास… पण नियतीचा क्रूर खेळ; मतमोजणीच्या दिवशी उमेदवाराचा मृत्यू

By-Election Results: बिहारनंतर भाजपनं जम्मू-काश्मीरमध्ये उधळला गुलाल; CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का, जाणून घ्या सर्व ८ पोटनिवडणुकांचे निकाल

DRIची मोठी कारवाई; मुंबई विमानतळावर १७.१८ कोटींचं कोकेन जप्त, टांझानियाच्या महिलेला अटक

Bihar Election Result Live Updates : बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक - राहुल गांधी

SCROLL FOR NEXT