वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमने निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं
दोन्ही पक्षांनी वेगवेळ्या महापालिकांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर
कोणला कुठून मिळाली उमेदवारी? जाणून घ्या
मुंबईत महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा सुरू केली आहे. ठाकरे बंधूंनी जागावाटपाचा फॉर्म्युला देखील ठरल्याचा दावा केला आहे. महायुतीनेही महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी झाल्याचा दावा केला आहे. एकीकडे सत्ताधारी आणि विरोधक युतीची घोषणा करत असताना निवडणुकीत स्वबळावर लढणाऱ्या वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम या दोन्ही पक्षांनी त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जारी केली आहे.
खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाने छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी ८ उमेदवारांची घोषणा केली आहे. जालन्यासाठी १ तर नाशिकसाठी ३ उमेदवारांची घोषणा केली आहे. तर वंचित बहुजन आघाडीने अकोला महापालिका निवडणुकीसाठी ५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
छत्रपती संभाजीनगरची एमआयएमची पहिली यादी जाहीर
प्रभाग 1 – अझहर अयुब खान
प्रभाग 3 – इम्रान पटेल
प्रभाग 9 – काकासाहेब काकडे
प्रभाग 9 – मतीन माजिद शेख
प्रभाग 12 – हाजी शेर खान अब्दुल रहमान खान
प्रभाग 28 – साबेर पाशू शेख
प्रभाग 28 – अब्दुल मतीन खान
प्रभाग 16 – सैयद फरहान नेहरी
जालना
मोहम्मद माजिद
नाशिक
प्रभाग 14 – जबीन रमजान पठाण
प्रभाग 30 – नगमा इरफान शेख
प्रभाग 15 – इलियास नूर शेख कुरेशी
तत्पूर्वी, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती होणार असल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळालाय. काँग्रेसकडून कोणताही सकारात्मक प्रस्ताव न आल्याने अखेर वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर लढण्याचा पवित्रा घेतलाय. वंचित बहुजन आघाडीने अकोल्यातील पाच उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
वंचित बहुजन आघाडीची अकोला महापालिकेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर
प्रभाग ७ (अ): किरण डोंगरे
प्रभाग ७ (ड): महेंद्र देविदास डोंगरे
प्रभाग ९ (अ): चंदू दादा शिरसाट
प्रभाग ९ (ब): नाज परवीन शेख वसीम
प्रभाग ९ (क): शामिम परवीन कलीम खान पठाण
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.