Maharashtra Political news  Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: राष्ट्रवादीत फूट? अजित पवारांसह काही आमदारांचा शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा?

राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्यासह काही आमदार शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Rashmi Puranik

Mumbai News: राज्यातील राजकीय घडमोडींना वेग आला आहे. महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्यासह काही आमदार शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसचे अजित पवार आणि छगन भुजबळ हे देखील शपथ घेण्याची शक्यता आहे, अशीही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. (Latest Marathi News)

अजित पवारांच्या राजकीय भूमिकेच्या चर्चांना उधाण आलं आहे. शिंदे-फडणवीस सरकारला छगन भुजबळ आणि अजित पवार हे सरकारला पांठिब्यासाठी राजभवनात दाखल झाले आहेत.राष्ट्रवादीचे 9 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. (Political News)

राष्ट्रवादीतील तब्बल ४० आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा असल्याचं बोललं जात आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये ९ मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अजित पवार यांच्यासहित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील राजभवनात दाखल झाले आहेत. अजित पवार आणि त्यांचे समर्थक आमदार सरकारला पाठिंबा देणार असल्याची चर्चा आहे.

अजित पवार यांनी आज राष्ट्रवादीतील काही आमदारांची बैठक बोलवली होती. या बैठकीला सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, अमोल कोल्हे यांच्यासह जवळपास 18 आमदार उपस्थित होते. मात्र या बैठकीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील गैरहजर होते अशी माहिती आहे. या बैठकीतून सुप्रिया सुळे निघून गेल्या होत्या. त्यानंतर अजित पवार काही आमदारांना सोबत घेऊन थेट राजभवनात दाखल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Birthday Gift: बायकोने नवऱ्याला 5 वस्तू चुकूनही भेट देऊ नये

Maharashtra News Live Update: कर्णकर्कश डीजेविरोधात पुण्यात आणखी एका आंदोलनाचे आयोजन

Maharashtra Politics: मोठी बातमी! शिंदेंकडून ठाकरेंना मोठा हादरा, बड्या नेत्यासह ७ नगरसेवक हाती घेणार 'धनुष्यबाण'

Vegetable juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या या 4 भाज्यांचे ज्यूस, पोटावरची चरही मेणासारखी वितळेल

Acidity Remedies : वारंवार पित्ताचा त्रास होतोय? 'हा' १ उपाय समस्येतून करेल सुटका

SCROLL FOR NEXT