शिरुर नगरपरिषद इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी अजित पवारांची फटकेबाजी... रोहिदास गाडगे
मुंबई/पुणे

शिरुर नगरपरिषद इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी अजित पवारांची फटकेबाजी...

शिरुर नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे आज भल्या सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उदघाटन झाले.

रोहिदास गाडगे

पुणे: शिरुर नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे आज भल्या सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उदघाटन झाले. याच कार्यक्रमात अजित पवार यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी केली. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार, नगराध्यक्ष वैशाली वाखारे, उपनगराध्यक्ष प्रकाश धारीवाल उपस्थित होते.

हे देखील पहा -

शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांचा उल्लेख व्यासपीठावर "राज्याचा कुबेर" बसला आहे. ते कधीच निधी कमी पडून देत नाही हे सांगताना देशाच्या कुबेराला राज्याच्या कुबेराचा सल्ला घ्यावा लागत आहे, असं सांगत अजितदादांना GST परिषदेचे अध्यक्ष केले आहे याची आठवण करून दिली. कोरोना काळात आर्थिक अडचणी असताना देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुद्धा अजितदादांचे कौतुक केले, असाही उल्लेख कोल्हेंनी केला.

अमोल कोल्हे यांच्या याच विधानाचा धागा पकडत अजित पवार म्हणाले की कोरोनानंतर राज्याची आणि देशाची मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. कोरोनानंतर सर्वांच्या आर्थिक उत्पन्नावरही मोठा परिणाम झालाय, असं सांगत सर्वांनी काटकसर करण्याची गरज असल्याचे स्पष्ट करत सामान्य नागरिकांच्या करामधून सरकारला मिळाळलेल्या निधीचा योग्य वापर करणे आपले कर्तव्य असल्याची स्पष्टोक्ती दिली उप मुख्यमंत्र्यांनी दिली.

पुढे अजित पवार म्हणाले की, करोडो रुपये खर्च करून बांधलेली सरकारी कार्यालये काही नागरिक गुटका-तंबाखू खाऊन पचापचा थुंकुन खराब करतात. बाबांनो, अस काही वेडवाकडं करू नका, असा उपस्थित नागरिकांना सल्ला देत काही चिमटेही काढले. तंबाखू खाऊन थुकणाऱ्या चांगला दंड करा, कॅमेऱ्यात हे सगळं आलं की दुसऱ्यांदा चांगला दंड करा. गंमतीचा भाग जाऊद्या पण, स्वछता राखा असं त्यांनी सांगितलं.

हीच मंडळी परदेशात गेली का कचरा खिशात ठेवता मग इथे आमच्याच देशात स्वच्छता राखायला काय होतंय? असा सवाल अजित पवारांनी केला. मात्र आपल्याकडे कडक वागलं की मतावर परिणाम होतो हेही सांगायला अजितदादा विसरले नाहीत.आणि मग उलट काही महाभाग तर पोलिसालाच दम देऊन सांगतात 67 पासून साहेबांच्या बरोबर असतोय तुला राहायचा की नाही? यावर एकच हशा पिकला.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes First Symptom: डायबेटिसचं पहिलं लक्षण दिसतं आपल्या डोळ्यात, नेमके काय बदल होतात? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: अजितदादा राज्याचे लवकरच मुख्यमंत्री होतील- आमदार अमोल मिटकरी

Health Tips : सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी या ५ गोष्टी कराच, आरोग्य राहिल उत्तम

Manikrao Kokate: निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना धक्का; माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द?

Bigg Boss Marathi Fame Actor : गुलीगत सूरज चव्हाणनंतर बिग बॉस मराठीचा 'हा' अभिनेता चढणार बोहल्यावर; थाटात पार पडलं केळवण, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT