Ajit Pawar, Sharad Pawar and Amol Kolhe SAAM TV
मुंबई/पुणे

Ajit Pawar News: अमोल कोल्हेंच्या बालेकिल्ल्यात आज अजित पवारांची तोफ धडाडणार; लोकसभेचा उमेदवार ठरणार?

Shirur Lok Sabha Election: आज सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे जंगी सभा घेणार आहेत. या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) जय्यत तयारी केली आहे.

Satish Daud

Shirur Lok Sabha constituency

देशभरासह महाराष्ट्रात आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे.निवडणुकीत आपल्याच पक्षाच्या सर्वाधिक जागा निवडून याव्यात, यासाठी महायुतीचे नेते मतदारसंघ पिंजून काढत आहेत. आज सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे जंगी सभा घेणार आहेत. या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) जय्यत तयारी केली आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शिरूर लोकसभा मतदारसंघ हा सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या ताब्यात आहे. २०१९ साली झालेल्या निवडणुकीत याठिकाणी अमोल कोल्हे खासदार म्हणून निवडून आले होते. राष्ट्रवादीतील फुटीनंतर अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांच्यासोबतच राहणे पसंत केले.  (Latest Marathi News)

त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार उभा करून कोल्हेंचा पराभव करण्याचा निर्धार अजित पवार यांनी केला आहे. त्यासाठी अजित पवारांनी (Ajit Pawar) काही दिवसांपूर्वी शिरूरचा दौरा देखील केला होता. आता ते थेट कोल्हेंच्या मतदारसंघात जंगी सभा घेणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे यांनाच उमेदवारी दिली जाणार हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे कोल्हेंचा पराभव करण्यासाठी अजित पवार गटाकडून आढळराव पाटलांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. आजच्या सभेत अजितदादा आपल्या उमेदवाराची घोषणा करतात का? हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, आजच्या सभेतून शिरुर तालुक्यातील घोडगंगा साखर कारखाना, चास-कमान पाणी, आमदार अशोक पवारांनी सोडलेली साथ असे अनेक मुद्दे केंद्रस्थानी राहणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे अजित पवार नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: तळोजा येथील अगरबत्ती बनवणाऱ्या कंपनीत भीषण आग...

Latur : हार्वेस्टरमध्ये ऊस टाकताना तोल गेला, मशीनमध्ये अडकून शरीराचे तुकडे तुकडे झाले, लातूरमध्ये शेतकऱ्याचा मृत्यू

Government Scheme: ना कोणतेही व्याज, ना गॅरंटी... मिळणार ५ लाखांचे लोन, अट फक्त ८वी पास

Ganpatipule : गणपतीपुळेमधील या हिडन प्लेसेसवर तुम्ही गेले आहात का? मग या न्यू ईयरला नक्की करा फिरायला जायचा प्लॅन

Actor Death: प्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT