ajit pawar saam tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar Exclusive Interview: 'शिंदे गटाच्या आमदारांना सूरत गाठण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांची मदत'; उद्धव ठाकरेंना कसं फसवलं?

Ajit Pawar Exclusive Interview: सकाळ समुहाच्या 'दिलखुलास अजितदादा' या कार्यक्रमात अजित पवार बोलते होते.

प्रविण वाकचौरे

Ajit Pawar Exclusive Interview: शिवसेनेनेत बंड झाल्यानंतर शिंदे गटाने मुंबईतून सूरत कसं गाठलं याची माहिती अजित पवार  यांनी दिली आहे. ठाणे आणि अजूबाजूच्या परिसरातील अधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांना मदत केल्याचा दावा, अजित पवार यांनी केला आहे. सकाळ समुहाच्या 'दिलखुलास अजितदादा' या कार्यक्रमात अजित पवार बोलते होते.

शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड केलं आणि राज्यातील सरकार पाडलं. मात्र महाराष्ट्रातून सूरत, गुवाहाटी, गोवा असा प्रवास या आमदारांनी केला. राज्यात महाविकास आघाडीची सरकार असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या आमदारांचा ताफा राज्याच्या बाहेर कसा गेला? ही किमया शिंदे गटाने कशी साधली? असा प्रश्न अनेकांना पडला होता. याबाबत मोठा खुलासा अजित पवार यांनी केला आहे. (Latest Marathi News)

उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर प्रचंड विश्वास होता. त्यामुळे त्यांनी ठाणे जिल्ह्याची पूर्ण जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवली होती. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या नेमणुका देखील एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यानुसार होत होत्या. ठाण्यातील सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांना दिले होते. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांना सूरत गाठण्यासाठी अधिकाऱ्यांची साथ मिळाली. (Breaking Marathi News)

एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांना सुरक्षितपणे सूरत गाठण्यासाठी त्यांच्या विश्वासातील अधिकाऱ्यांनीच मदत केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिथं असतील तिथून या या सर्वांच्या गाड्या वळवा आणि मातोश्रीवर आणा असे आदेश दिले होते.

मात्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सही असली तरी अधिकाऱ्यांना तिथं बसवण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केलं होतं. ते सर्व अधिकारी एकनाथ शिंदेंशी एकनिष्ठ राहिले. त्यामुळे गाड्या पद्धतशीरपणे राज्यातून बाहेर पडेपर्यंत अधिकारी गप्प राहिले आणि नंतर उद्धव ठाकरेंना म्हणाले अजून कुठे काही दिसतं नाही, असा किस्सा अजित पवारांनी सांगितला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : जळगावात एटीएम मशीन चोरीला; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

Skin Care Summer: उन्हाच्या कडाक्यात चेहऱ्याला लावू नका या गोष्टी, डॉक्टरांनी दिल्या टिप्स

Kalyan : कल्याणमध्ये भीषण अपघात, भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, डॉक्टरचा जागीच मृत्यू

Maharashtra Politics: राहुरीत राजकीय घडामोडींना वेग, भाजप उमेदवाराच्या विरोधात माजी मंत्री रिंगणात

Late periods causes: मार्च महिन्यात मासिक पाळी का येते उशीरा? डॉक्टरांनी सांगितलं यामागील कारण

SCROLL FOR NEXT