Ajit Pawar Plane Crash  saam tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या विमान अपघातप्रकरणी CID ने काय माहिती दिली?

Ajit Pawar Plane Crash CID Press Conference: बारामती येथील अजित पवार विमान अपघात प्रकरणात सीआयडी अधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण अपडेट्स दिलेत. सीआयडी तपास घातपात, निष्काळजीपणा आणि संभाव्य गुन्हेगारी कट या तीन प्रमुख बाजुंनी केला जातोय.

Bharat Jadhav

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर हा घातपात असल्याची शंका व्यक्त केली जातेय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हे प्रकरण उचलून धरलं आहे. दरम्यान या अपघात प्रकरणाची सीआयडीकडून चौकशी केली जात आहे. सीआयडी तपास कुठंपर्यत आलाय? तपासात सीआयडीच्या हाती कोणता पुरावा लागला याची माहिती देण्यासाठी, आज सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली.

बारामती येथील २८ तारखेला झालेल्या विमान अपघात गांभीर्य लक्षात घेता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मित मृत्यू तपास सीआयडीकडे वर्ग केला आहे. सुनील रामानंद,अप्पर पोलीस महासंचालक यांनी अपघात तपासाबाबत माहिती देताना सांगितलं की, सीआयडी घातपात ? हलगर्जीपणा ? गुन्हेगारी कृत्य घडले आहे का? या तीन बाजुंचा तपास करत आहे.

अजित पवार यांच्या अपघात प्रकरणाचा तपास योग्य दिशेने आणि वेगाने केला जात आहे. तपासात वैद्यकीय महाविद्यालय, पुणे फॉरेन्सिक लॅब आणि केंद्रातील अनेक संस्था आपल्याला मदत करत आहेत. तपासात AAIb याचा निष्कर्ष लक्षात घेतला जाणार आहे. राज्य शासनाने सीबीआयकडे वर्ग करण्याचा ही निर्णय घेतल आहे. तीनपैकी काही निष्पन्न झाल्यास सीआयडी योग्य अशा कलमाखाली न्यायालयात जाईल. तपास योग्य दिशेने चालला आहे.

या आकस्मिक मृत्यू मागे घातपात आहे का? हा देखील तपासाचा भाग आहे. दुसरा भाग म्हणजे क्रिमिनल निग्लीजन्स आहे का? याचा देखील तपास होतो आहे. तिसरा भाग म्हणजे हा गुन्हेगारी कट आहे का? या अंगाने देखील तपास होत असल्याची माहिती सुनील रामानंद , अप्पर पोलीस महासंचालक यांनी दिली. यावेळी त्यांनी VSR कंपनीचा हलगर्जीपणा आढळून आला का अशा प्रश्न करण्यात आला.

प्रश्न - VSR कंपनीवर DGCA कडून कारवाई झालीय, तुमच्या तपासात या कंपनीकडून हलगर्जीपणा आढळून आलाय का ?

उत्तर - तांत्रिक तपास हा वेगळा भाग आहे आणि आमचा CID चा तपास हा आकस्मिक मृत्यू बद्दल आहे. आमच्या तपासात काही पुरावे मिळाले आहेत, असं अप्पर पोलीस महासंचालक म्हणालेत.

Gold, Silver Rate: बाजारातील चमक उडाली! सोन्यासह चांदीचे दर घसरले; चांदीच्या किमतीत ११,००० रुपयांची मोठी घसरण, जाणून घ्या आत्ताचे नवे दर

अजित पवारांच्या अपघातामध्ये गुन्हेगारी कट? CID ने काय सांगितले? VIDEO

Maharashtra Live News Update : राजुरहून अहिल्यानगरच्या दिशेने निघालेला लाँगमार्च लोणीकडे रवाना

Shocking : पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ; इमारतीच्या २४ व्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू

The Kerala Story 2 Movie Controversy: 'द केरल स्टोरी 2' निर्मात्याला हायकोर्टाचा मोठा दणका; थेट चित्रपटाच्या रिलीजवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT