पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत काटेवाडीतील घरातील नारळ चोरीचा किस्सा सांगितला. अजित पवार यांनी बारामतीमधील एका मंगल कार्यालयाचे उद्घाटनाच्या कार्यक्रमात हा किस्सा सांगितला. अजित पवार यांनी हा किस्सा सांगितल्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाचे उद्घाटन झालं. यावेळी या कार्यालयाच्या परिसरामध्ये पाच फुटाच्या अंतरावर नारळाची झाडे लावल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी अजित पवारांनी नारळाच्या झाडामधील अंतर 25 फुटाचं पाहिजे, असे अजित अजित पवारांनी सांगितले. यातील नारळ चोरीला गेले तरी 50% शिल्लक राहतील, असेही त्यांनी सूचवले.
'मीही आमच्या काटेवाडीच्या घरात बाजूला नारळाची झाडे लावत होतो. त्यावेळी नारळाची झाडे चोरीला जात होती. यावर अनेकदा माझ्या आईने देखील अरे अजित किती झाडे लावतो, असं सांगितलं होतं. मात्र मी देखील आईला सांगितलं की, झाडे लावणारा थकतोय की झाडे चोरणारा... मात्र काही दिवसांनी तोच झाडे चोरणारा थकला, असे अजित पवारांनी म्हणताच सगळीकडे एकच अशा पिकला.
बारामतीच्या पणदरेच्या घटनेवर अजित पवार काय म्हणाले?
अजित पवार म्हणाले, 'पणदरे या ठिकाणी जी घटना घडली, ती चुकीची आहे. त्यामुळे पालकांनी शेती करत असताना आपल्या मुलांकडे लक्ष दिले पाहिजे. सोशल मीडियावर काही ग्रुप काढले आहेत. त्यावर चुकीचं काम करत आहेत. त्यामुळे या गोष्टी थांबल्या पाहिजेत. पोलीस प्रशासनाला चांगल्या सुविधा देत आहोत. त्यामुळे त्यांनी कायदा सुव्यवस्था नीट राखली पाहिजे'
'ड्रोन प्रकरणामुळे शेतकरी भयभीत आहेत. त्यामुळे मी दोन गन मशीन दिल्या आहेत. यावर एक तोडगा निघेल. या ड्रोनमधून पाकिस्तान सारखी राष्ट्रे ड्रग्ज पाठवत आहेत. चुकीची कामे करीत आहेत. त्यामुळे अशा गोष्टींना आळा बसवण्यासाठी दोन आधुनिक मशीन गन दिल्या आहेत. या गनमधून असे प्रकार रोखता येईल,असे अजित पवार यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.