Ajit Pawar, Sharad Pawar , NCP Saam TV
मुंबई/पुणे

Ajit Pawar News: शरद पवारांच्या आत्मचरित्रात पहाटेच्या शपथविधीवर भाष्य, अजित पवारांची पहिलीच प्रतिक्रिया

Ajit Pawar News: अजित पवार यांनी पहाटेच्या शपथविधीवर बोलणं टाळलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai News : अजित पवार यांनी भाजपसोबत जात सकाळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ का घेतली? त्यानंतर अजित अजित पवार यांचं बंड कसं थोपवलं याचा सविस्तर उल्लेख  शरद पवार यांचं आत्मचरित्र लोक माझे सांगातीमध्ये करण्यात आला आहे. अजित पवार यांना याबाबत विचारलं असता मी पुस्तक वाचलं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

अजित पवार (Ajit Pawar) यांनी पहाटेच्या शपथविधीवर बोलणं टाळलं आहे. अजित पवार यांनी म्हटलं की, लोक माझे सांगाती पुस्तक मी अद्याप वाचलेलं नाही. त्यामुळे मला याबाबत काहीच माहित नाही. मी पुस्तक वाचून याबाबत सविस्तर प्रतिक्रिया देईल, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

काँग्रेस नेत्यांची आडमुठेपणाची भूमिका

सरकार स्थापनेची चर्चा सुरु असताना काँग्रेससोबत चर्चा फार निखळ स्वरुपाची होत नव्हती. काँग्रेस नेत्यांच्या आडमुठेपणाच्या भूमिकेमुळे चर्चेत रोज अडचणी येत होत्या. आम्ही अतिशय सामंजस्य पद्धतीने काँग्रेसला समजून घेत होतो. परंतु त्यांचा प्रतिसाद काहीसा अडेलतट्टू होता, असं पुस्तकात म्हटलं आहे.

एकत्रित बैठकांचा सपाटा सुरू असतानाच अशाच एका बैठकीत संगत राहणं अवघड गेलं. यापुढे बोलण्यात अर्थ नाही, अशी भावना झाली. सरकारस्थापनेत एक नाट्यमय वळण येणार आहे याची आम्हा कुणालाच कल्पना नव्हती. अजित भावनाप्रधान आहे आणि तिरीमिरीत त्यानं हे पाऊल उचललं असावं, असा माझा अंदाज होता, असं शरद पवारांना पुस्तकात म्हटलं. (Political News)

अजित पवारांचं बंड कसं मोडलं?

बंड मोडुन काढण्याचा आम्ही पहिला निर्णय घेतला. आमच्या पदाधिकाऱ्यांशी आणि सहकाऱ्यांशी बोलून गेलेल्या सर्व आमदारांना परत आणण्यासाठी पावलं उचलायला मी सांगितली. 'चव्हाण प्रतिष्ठान'ला राष्ट्रवादीचे चोपन्नपैकी पन्नास आमदार उपस्थित असल्यानं तशीही बंडातली हवा निघालीच होती.

तरीही महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत नेमकी माहिती पोहचणं आवश्यक होतं. त्याचाच भाग म्हणून आम्ही पत्रकारपरिषद घेतली. या पत्रकारपरिषदेला उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेतेही उपस्थित राहिल्यानं 'महाविकास आघाडी' अभेद्य असल्याचा पक्का संदेश गेला, असंही पुस्तकात सांगण्यात आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंना मोठा धक्का;चंद्रकांत पाटील विजयाच्या वाटेवर

पुन्हा येईन! भाजपच मोठा भाऊ, देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार का?

Pravin Darekar: महाराष्ट्राच्या जनतेची पुन्हा आम्हाला पसंती, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया | Video

Protein Bar: प्रोटीन बार तुमच्या शरीरासाठी चांगले आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Maharashtra Election Result : राज्यातील पहिला अधिकृत निकाल, भाजपच्या उमेदवाराचा दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT