Ajit Pawar And Jayant Patil News Saam TV
मुंबई/पुणे

Ajit Pawar on Jayant Patil: "तुम्ही जाणीवपूर्वक..." ; जयंत पाटलांच्या ईडी चौकशीवर अजित पवारांनी अखेर मौन सोडलं

Ajit Pawar News: जयंत पाटलांच्या ईडी चौकशीवर अजित पवारांनी अखेर मौन सोडलं

Rashmi Puranik

Ajit Pawar News Today: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सोमवारी ईडीकडून तब्बल साडेनऊ तास चौकशी करण्यात आली. ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर जयंत पाटील यांनी सर्व प्रश्नांची उत्तरं दिल्याची प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, जयंत पाटलांची चौकशी झाल्यानंतर त्यांना महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी फोन केले. मात्र, अजित पवारांचा फोन आला नसल्याची माहिती खुद्द जयंत पाटलांनी दिली. त्यामुळे या दोघांमधल्या नाराजीच्या चर्चा पुन्हा रंगू लागल्या आहेत. मात्र, या चर्चेवर आता खुद्द अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

अजित पवार (Ajit Pawar)म्हणाले की, 'ज्या वेळी पासून आम्ही सत्तेत आहे, मी कोणत्याही व्यक्ती संदर्भात वक्तव्य केलं आहे. जयंत पाटील (Jayant Patil) यांना एकट्यालाच ईडीने चौकशीसाठी बोलावलं नाही. याआधी अनेक नेत्यांना ईडी (ED) चौकशीसाठी बोलावलं आहे. त्यावेळी मी काही वक्तव्य केलं असेल तर मला दाखवा. तुम्ही जाणीवपूर्वक काही अर्थ काढण्याचा प्रयत्न करता असं अजित पवार म्हणाले आहेत.

माझ्याही बाबतीत आयकर विभागाने २२ ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. त्यावेळी काय बोलायचं ते मी बोललो होतो. त्यानंतर पुन्हा मी माझ्या कामाला लागलो तपास यंत्रणांना चौकशीचा अधिकार आहे. या यंत्रणांनी चौकशीला बोलावल्यानंतर नेतेमंडळी पूर्णपणे सहकार्य करतात. जयंत पाटलांना साडेनऊला सोडल्यानंतर त्यांचं स्टेटमेंट आपण पाहिलंय असंही पुढे अजित पवार म्हणालेत. (Political News)

ईडीकडून जयंत पाटील यांची साडेनऊ तास चौकशी

दरम्यान, ईडीकडून जयंत पाटील यांची साडे नऊ तास चौकशी झाली. ईडीकडून चौकशी झाल्यानंतर कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर जयंत पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले की, 'आज तुम्ही दिवसभर थांबला. महाराष्ट्रातील गावातून येथे येऊन दिवसभर समर्थन दिलं. माझ्यावर प्रेम व्यक्त केलं. पक्षाला समर्थन दिलं. तुम्ही दिलेल्या पाठिंब्यासाठी आभारी आहे'.

'ईडीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तर दिले आहेत. ईडीकडे आता कोणतेही प्रश्न शिल्लक नसतील. नागरिक म्हणून मी कर्तव्य पूर्ण केलं आहे. दिवसभरात मी अर्ध पुस्तक वाचून काढलं आहे', असेही जयंत पाटील म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saina Nehwal: सायना नेहवाल - पारूपल्ली कश्यप विभक्त, ७ वर्षांचा सुखी संसार मोडला; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

Plane Crash: उड्डाण घेताच काही सेकंदात विमान कोसळलं, उडाला मोठा भडका; परिसरात काळेकुट्ट धुरांचे लोट; अपघाताचा थराराक VIDEO

Wardha News : अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसमध्ये सीटवर बसण्यावरून वाद; तरुणाकडून प्रवाशावर ब्लेडने सपासप वार

Viral Video: मी आता आझाद झालोय! घटस्फोटाच्या आनंदात पठ्ठ्याची दुधाने अंघोळ, व्हिडिओ व्हायरल

Stunt Artist Raju Death : सिनेमाच्या सेटवर मोठी दुर्घटना; प्रसिद्ध कलाकाराचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT