ajit pawar  Saam tv
मुंबई/पुणे

अजित पवारांचं टेन्शन वाढलं; ऐन निवडणुकीत मित्रपक्षाने पाठिंबा काढून घेतला

ajit pawar news : ऐन निवडणुकीत अजित पवारांचं टेन्शन वाढलंय. निवडणुकीचा प्रचार सुरु असतानाचा मित्रपक्षाने पाठिंबा काढून घेतला आहे.

Akshay Badve

पुण्यात राजकीय घडामोडींना वेग

ऐन निवडणुकीत अजित पवारांना मोठा धक्का

मित्रपक्षाने अजित पवारांची साथ सोडली

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पुण्यात भाजप-शिंदेसेना विरुद्ध दोन्ही राष्ट्रवादींची लढाई पाहायला मिळतेय. दोन्ही युत्यांमध्ये भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे टेन्शन वाढलं आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या साथीने लढणाऱ्या सचिन खरात यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाने निवडणकीतून माघार घेतला आहे.

अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. या दोन्ही महापालिका क्षेत्रात अजित पवारांनी प्रचाराचा धडका लावला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाही जोमाने काम करण्याचं आवाहन अजित पवार करत आहेत. या दोन्ही राष्ट्रीवादीच्या साथीला सचिन खरात यांची रिपाईं देखील धावून आली होती.या निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उभे केलेले उमेदवार सचिन खरात यांच्या गटाचे असल्याचेही सांगितले जात होते.

गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार सचिन खरात गटाचे असल्याने राज्याच्या राजकारणात त्यांची जोरदार चर्चा सुरू होती. परंतु आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेतली आहे.

आमचा या निवडणुकीत कोणत्याच उमेदवारांना पाठिंबा नसल्याचे सचिन खरात यांनी जाहीर केलं आहे. 'सन्मानपूर्वक जागा मिळाव्यात म्हणून मी अजित पवारांसोबत गेलो होतो. परंतु त्याप्रमाणे जागा मिळाल्या नाहीत. त्यामुळे आम्ही महापालिकेच्या निवडणुकीतून बाहेर पडत आहे. माझा कोणत्याच उमेदवारांना पाठिंबा नाही. दोन पावलं मागे आले तरी चालेल, पण चुकीचं काम करणार नाही, असं खरात यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: मुलीला शिकवतात म्हणून गावकरी हसले, पण मोठ्या जिद्दीने पहिल्याच प्रयत्नात केली UPSC क्रॅक; IAS सुलोचना मीना यांचा प्रवास

Maharashtra Live News Update : पुण्यात शिवजयंतीनिमित्त शोभायात्रा, वाहतूकीत महत्त्वाचे बदल

Relationship Tips: हे ५ संकेत दिसले तर समजा तुमचा पार्टनर ब्रेक-अप करण्याचा विचार करतोय

Puranpoli: होळीला नैवेद्य करताना पुरणपोळी नेहमी फुटते? मग वापरा ही आजीने सांगितलेली टिप, वाचा ही सिक्रेट टिप

Plastic Stool: स्टूलमध्ये छोटे छिद्र का असते? डिझाईन समजण्याची करू नका चूक!

SCROLL FOR NEXT