maharashtra Politics  Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून राजकारण तापलं; ठाकरे गटाकडून अजित पवार लक्ष्य, कोण नेमकं काय म्हणालं?

Maharashtra Political News : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून राजकारण तापलं आहे. ठाकरे गटाकडून अजित पवारांना लक्ष्य करण्यात आलं आहे. ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी अजित पवारांवर तोफ डागली आहे.

Vishal Gangurde

सचिन जाधव, साम टीव्ही

राज्यात संतोष देशमुख प्रकरणावून राजकारण तापलं आहे. या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांना लक्ष्य केलं जात आहे. विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र, आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत कारवाई करणार नसल्याचं अजित पवारांनी म्हटलं. त्यावरून ठाकरे गटाने अजित पवारांना लक्ष्य केलं आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत अजित पवारांनी सूचक वक्तव्य केलं होतं. अजित पवारांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात थेट भूमिका घेणे टाळले. त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. आज अजित पवारांच्या भूमिकेवर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी टीकास्त्र डागलं आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या, सुरेश धस यांचे धनंजय मुंडे यांच्यावर गेल्या अनेक दिवस वेगवेगळे आरोप करत आहे. एकीकडे धस आरोप करतता, तर दुसरीकडे अजित पवार त्याच भाजपच्या स्टेजवर एकत्रित कार्यक्रम करत आहेत. त्यामुळे धस यांच्या आरोपांना अजित पवारांची एका अर्थाने मूकसंमती आहे'.

'एकीकडे सिंचन घोटाळ्यात आरोप झाल्यानंतर राजीनामा दिला होता, असे अजित पवार म्हणतात. तर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायचा की नाही हे धनंजय मुंडे यांनी त्याचं त्याचं ठरवावे, असं अजित पवार म्हणत आहेत. याचा अर्थ हात वर करणे होय.

'धनंजय मुंडे यांनी राजनामा द्यावा, मात्र तो राजीनामा देत असताना त्याचं बिल त्याचं पाप आपल्या नावावर फाटू नये, यासाठी अजितदादा सेफ झोनमधला उत्तम खेळ खेळत आहेत. या माध्यमातून धनंजय मुंडे यांच्या पाठीशी असणाऱ्या लोकांचे आपल्याला खलनायक व्हायचं नाही असं अजित पवारांचं मत असावं, अशी टीका अंधारे यांनी केली. सुषमा अंधारे यांच्या टीकेनंतर अजित पवार गटाकडू काय प्रत्युत्तर दिलं जातं, हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT