Ajit Pawar on Sharad Pawar Saam Tv News
मुंबई/पुणे

Ajit Pawar News: शरद पवार येणार आहेत, मी येणार नाही; अजित पवारांनी कार्यक्रमाच्या आयोजकांना खडसावलं?

Ajit Pawar on Sharad Pawar: माझ्या आधी शरद पवार आणि छगन भुजबळ यांची वेळ घेतली, आता मी येणार नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयोजकांना खडसावल्याचं समजतं. तसंच कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास नकार दिलाय.

रोहिदास गाडगे

'माझ्या आधी शरद पवार आणि छगन भुजबळ यांची वेळ घेतली, आता मी येणार नाही,' अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयोजकांना खडसावलंय. चाकण येथे महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सवित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा आहे. या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि छगन भुजबळ यांची वेळ घेण्यात आली. मात्र, माझ्या आधी वेळ त्यांची घेतली, आता मी येणार नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी कार्यक्रमाला येण्यास थेट नकार दिल्याचे सांगण्यात येते.

क्रांतीज्योती सवित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त, चाकण येथे महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सवित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमानिमित्त शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि छगन भुजबळ यांची वेळ घेण्यात आली. त्यानंतर आयोजक अजित पवार यांच्याकडे गेले. मात्र, शरद पवार यांची माझ्या आधी वेळ घेतली, आता मी येणार नाही, अशा शब्दात आयोजकांना अजित पवारांनी खडसावल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात आले.

अजित पवार यांच्याआधी आयोजकांनी शरद पवार आणि छगन भुजबळ यांची वेळ घेतली. शरद पवार यांच्या उपस्थितीत होत असलेल्या कार्यक्रमाला अजित पवार अनुपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत होत असलेल्या कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित राहणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

अजित पवार आणि शरद पवार यांची भेट याआधी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त झाली होती. त्यानंतर अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांनी विठ्ठलाचे दर्शन घेत, पवार कुटुंब एकत्र येण्यासाठी साकडं घातलं होतं. त्यानंतर पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार का? राष्ट्रवादी पुन्हा एकसंध होणार का? अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झालीय. मात्र, मंत्रिपदावरून सुरू झालेल्या नाराजीनाट्यानंतर छगन भुजबळ आणि शरद पवार पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्यांच्यात नेमकी कोणती चर्चा होणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Edited By - Bhagyashree Kamble

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदेंच्या गुंड नगरसेवकाची डॉक्टरांना मारहाण प्रकरणानंतर राजकारण तापलं; राज ठाकरेंच्या शिलेदाराची KDMC मध्ये धडक

Maharashtra News Live Update: मालेगावच्या रमजान पुरा भागात ATS च्या पथकाचा छापा...

Tukaram Mundhe : इतर राज्यांनाही हवा महाराष्ट्रातील 'मुंढे पॅटर्न'; देशभरातील बडे अधिकारी दौरा करणार?

Maharashtra Politics: विनोद तावडेंच्या भेटीनंतर एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर; ठाकरेंसोबतच्या भेटीमागचं नेमकं कारण काय?

मोठी बातमी! सरकारनं ५० हजारांसह हटवली आणखी एक अट; आता 'त्या' शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी

SCROLL FOR NEXT