Ajit Pawar addressing the media after the meeting regarding the Koregaon Park land transaction update Saam TV
मुंबई/पुणे

१८०० कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप झाला 'तो' व्यवहारच रद्द; अजित पवारांनी दिली माहिती

Ajit Pawar on Koregaon Park Land Allegations : अजित पवार यांनी कोरेगाव पार्क जमिनीचे व्यवहार रद्द केल्याची माहिती दिलीय. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर ही माहिती देण्यात आली.

Bharat Jadhav

कोरेगाव पार्कमधील ४० एकर जमीन खरेदी प्रकरणामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार अडचणीत आलेत. हे प्रकरण बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्रीफडणवीस यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. जर यात काही तथ्य आढळले तर कारवाई करण्यात येईल, असे संकेत दिले होते. त्यानंतर या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला.

याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आलीय. आज वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्यात झालेल्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. पुण्यातील कोरेगाव पार्कमधील जमीन व्यवहार रद्द करण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

काय म्हणाले अजित पवार?

आजपर्यंतच्या माझ्या ३५ वर्षांच्या राजकीय जीवनात कधीही नियम सोडून काम केलं नाहीये. २००९ -१० ला आरोप झाले, ते कुठेही सिद्ध झाले नाहीत. दरम्यान पुण्यातील व्यवहाराची मला अजिबात माहिती नव्हती. माहिती असते तर मला विचारून व्यवहार झाला आहे, असे म्हटलो असतो. माझ्या नातेवाईकांनी किंवा जवळच्या व्यक्तीने व्यवहार केला तर मी त्यांना नियमाला धरून व्यवहार करा, असे सांगतो.

राज्याचे मुख्यमंत्री नागपूरला होते. त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. जरी माझ्या घरातील संबंधितांशी विषय असला तरी तुम्ही जे काही पाऊल उचलायचे ते उचला, माझा पाठिंबा राहील, असं सांगितलं.

जमिनीचा व्यवहार रद्द

या प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर या व्यवहारात एक रुपयाही दिला गेला नाहीये. तरीही मोठमोठे आकडे सांगितले. गोष्टी सांगितल्या गेल्या. विरोधकांनीही टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. परंतु, आज संध्याकाळी कळालं की यामध्ये जे काही कागदपत्रे झाली होती. ते कॅन्सल करण्यात आले आहे. व्यवहार रद्द केला आहे.

या राज्याचे चीफ सेक्रेटरी रिव्हेन्यू आणि वेगवेगळे मान्यवर यांची समिती स्थापन केली आहे. चौकशी करून एका महिन्याच्या आत अहवाल सादर करावा अशा सूचना केल्या आहेत, असं अजित पवार म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: या राशींनी आज कोणताही निर्णय घेताना पक्केपणा ठेवावा, वाचा राशीभविष्य

Maharashtra Live News Update: 'खुर्च्या तोडण्यासाठी नको तर परिवर्तनासाठी नगरपालिका हवी' देवेंद्र फडणवीसांचा शिंदेसेनेला टोला

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT