Ajit Pawar on Chhagan Bhujbal Saam tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar News: 'दोन भावांची वेगवेगळी मते'; छगन भुजबळांच्या 'त्या' वक्तव्यावर अजित पवार थेटच बोलले

Ajit Pawar on Chhagan Bhujbal: 'मला पक्षातून काढावं आणि आमदारकी रद्द करावी, त्यांनी हे केलं तरी माझं काम सोडणार नाही, अशी भूमिका छगन भुजबळांनी घेतली आहे. छगन भुजबळांच्या विधानावर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

Vishal Gangurde

Ajit Pawar On Chhagan Bhujbal News :

मराठा आरक्षणासंदर्भातला अध्यादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना सोपवल्यानंतर ओबीसी समाजातील नेत्यांकडून विरोध पाहायला मिळत आहे. जरांगे यांना दिलेल्या अध्यादेशावरून मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्याच सरकारविरोधात भूमिका घेतली आहे. 'मला पक्षातून काढावं आणि आमदारकी रद्द करावी, त्यांनी हे केलं तरी माझं काम सोडणार नाही, अशी भूमिका छगन भुजबळांनी घेतली आहे. छगन भुजबळांच्या विधानावर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे. (Latest Marathi News)

भुजबळांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला मोठं विधान आलं आहे. भुजबळांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे. भुजबळांच्या या वक्तव्यावर अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अजित पवार काय म्हणाले?

'घरांमध्ये दोन भाऊ असले तरी त्यांचे दोन वेगवेगळी मते असतात. घरांमधील लोक एकत्र बसून समज-गैरसमज दूर करतात. याबद्दल देवेंद्र फडणवीसांनीही नागपूरला याबाबत भाष्य केलं आहे. त्यांनी म्हटलं की, मुंबईला आल्यावर भुजबळांशी बोलू. त्यांनीही स्पष्ट केलं की, ओबीसींवर अन्याय झाला असं वाटत नाही. परंतु त्यांच्याशी बोलू. मीही तसंच सांगतो की, मलाही बोलण्यासाठी वेळ द्या, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर राज्य सरकारची भूमिका काय असेल? हे पाहणंच महत्त्वाचं ठरणार आहे.

छगन भुजबळ काय म्हणाले होते?

सरकारच्या मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करण्याच्या मागणीवर छगन भुजबळांनी भाष्य केलं आहे. साम टीव्हीच्या मुलाखतीत भुजबळ म्हणाले, 'मला पक्षाच्या पाठिंब्याची गरज नाही. मला ओबीसी आणि मागासवर्गीय, भटक्या विमुक्त समाजाचा पाठिंबा मिळाला तरी पुरेसा आहे. त्यांच्या कल्याणासाठी मी उभा राहील. मग तेव्हा पक्ष असेल, आमदारकी, मंत्रिपद असलं तरी त्यांच्या भल्यासाठी उभा राहणार'.

'ओबीसी समाजासाठी त्यावेळी जीव धोक्यात घालून शिवसेना सोडली. त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं पाहिजे. त्यामुळे त्यांनी पक्षातून काढावं. आमदारकी काढावं. सरकारमधून काढावं. पण मी माझं काम सोडणार नाही, अशी भूमिका छगन भुजबळांनी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; क्रिप्टो गुंतवणुकीत गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

Gold Price Today: सुवर्णनगरीत सोनं-चांदीच्या दरात घसरण, १ तोळा सोनं १ लाख ५८ हजार रुपयांवर

SCROLL FOR NEXT