Ajit Pawar saam tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar Speech : 'तुम्ही माझ्या बायकोला निवडून दिलं तर...'; अजित पवार स्पष्टच बोलले

Ajit Pawar Speech In pune : तुम्ही माझ्या बायकोला निवडून दिलं तर माझी जबाबदारी वाढणार आहे. उद्या बायकोने काम करून दे म्हटलं तर सकाळी उठून करून द्यावेच लागेल, नाहीतर काही खरं नाही, असं भाष्य अजित पवारांनी केले.

Vishal Gangurde

अक्षय बडवे, पुणे

पुणे : बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे आणि सूनेत्रा पवार आमनेसामने उभे ठाकले आहेत. या लढाईमुळे या लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीसाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी मतदारसंघात तळ ठोकला आहे. यासाठी अजित पवार यांनी देखील मतदारांच्या भेटीगाठी वाढवल्या आहेत. अशात एका भाषणादरम्यान तुम्ही माझ्या बायकोला निवडून दिलं तर माझी जबाबदारी वाढणार आहे. उद्या बायकोने काम करून दे म्हटलं तर सकाळी उठून करून द्यावेच लागेल, नाहीतर काही खरं नाही, असं भाष्य अजित पवारांनी केले.

अजित पवार हे मंगळवारी रात्री खडकवासला विधानसभा मतदारसंघात बारामती लोकसभा निवडणुकीत प्रचारार्थ नागरिकांच्या आणि युतीच्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत होते. त्यावेळी अजित पवारांनी उपस्थितांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले, या गावाची ८० टक्के जागा एनडीएसाठी घेतली आहे. आता बंधन आणि तोडगा काढायचा आहे. हे केव्हा निघेल, जेव्हा संरक्षण मंत्र्यांचा विचाराचा खासदार ज्या वेळेस जाईल, तेव्हा मिळेल.

'आम्ही म्हणतोय घड्याळ मतदान करा म्हणजे आपोआप होईल. तुम्ही निवडून दिलेल्या विरोधी पक्षाच्या खासदाराच तिथं चाललंच नाही. आता त्यांना सोडलं. आम्हाला सोडून गेले. आम्ही आमचा पक्ष ठेवला, असे ते म्हणाले.

'माझा तुम्हाला फायदा होणार आहे. तुम्ही माझ्या बायकोला निवडून दिलं तर मी तुमचा पालकमंत्री आहे. पुणे पालिका, पिंपरी चिंचवड, पीएमआरडीए, जिल्हा परिषद, राज्य सरकार निधी आहे. माझी पणं जबाबदारी वाढणार आहे. उद्या बायको घरी म्हणाली की, हे काम करुन द्या, तर सकाळी मला करुन द्यावेच लागणार आहे, नाहीतर माझं काही खरं नाही, असे अजित पवार पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडक्या बहि‍णींसाठी खूशखबर; नागपुरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गेमचेंजर घोषणा

नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती, कधी होणार मतदान?

Friday Horoscope : पैशांची चिंता मिटणार,लक्ष्मी प्रसन्न होणार; ५ राशींच्या लोकांसाठी शुक्रवार गेमचेंजर ठरणार

Pune Politics: आरोप सिद्ध नाही झाले तर राजकारण सोडा; मुरलीधर मोहोळ यांचे अजित पवारांना "ओपन चॅलेंज"

भारत-कंबोडिया ते व्हिएन्टिन, दररोज व्हायची मारहाण; किडनी विकलेल्या शेतकऱ्याने मांडली व्यथा, काँग्रेस मदतीला धावली

SCROLL FOR NEXT