Ajit Pawar, Ajit Pawar Apology, saam tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar Apology : अजित पवारांची दिलगिरी, माझ्याकडून असे व्हायला नको हाेते...

अजित पवार बारामतीहून काेल्हापूरला रवाना झाले.

मंगेश कचरे

Ajit Pawar Apologies : एखाद्यावेळी आपलं चुकलं तर ती चूक मान्य करुन पुढे जायचं असतं. त्यात काही कुणाचं बिघडत नाही असे सांगून विराेधी पक्ष नेते अजित पवार यांनी फुले यांचा हाेळकर उल्लेख एका कार्यक्रमात केल्याने काल तिथेच दिलगिरी (Ajit Pawar Apology) व्यक्त केल्याचे नमूद केले. विराेधी पक्ष नेते अजित पवार हे आज बारामतीत आले हाेते. नियाेजित कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

एका कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांचा उल्लेख सावित्रीबाई हाेळकर असा अजित पवार यांच्याकडून झाला. त्याबाबत माध्यमांनी छेडले असता ते म्हणाले बोलण्याच्या ओघात माणसाकडून चूक होत असते. मात्र मिडियाकडून त्याचा गवगवा केला जातो. काल सावित्रीबाईंबद्दल बोलताना चूक झाली, सावित्रीबाई होळकर असे चूकन बोललो होतो. असा काय गुन्हा केला होता. असं काय आकाश पातळ एक झालं अशी टिप्पणी दादांनी केली.

मी अनेक महत्वाच्या पदांवर काम केलंय. माझ्याकडून असं व्हायला नको हाेते. पण बोलण्याच्या ओघात सावित्रीबाई होळकर असं बोललो. त्याबद्दल लगेच दिलगीरीही व्यक्त केली. आपली परंपरा आहे चूक झाली तर दिलगिरी व्यक्त करुन पुढे जायचं असतं. त्यात काही कुणाचं बिघडत नाही असेही पवारांनी स्पष्ट केले.

दरम्यान आज अचानक तुमच्या सुरक्षतेत पाेलिसांनी वाढ केली आहे. नेमके कारण काय असे विचारताच दादा म्हणाले मला त्याबद्दल काही माहिती नाही, तुम्हीच पोलिसांना विचारा. त्यांना असं वाटलं असेल तू काहीतरी माझ्यावर हल्ला करणार आहे, म्हणून वाढ केली असावी असेही मिश्किलपणे पवार (ajit pawar) यांनी माध्यम प्रतिनिधींना उत्तर दिले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुरुपसिंग नाईक अनंतात विलीन...

Silver Price: २० वर्षांपूर्वी 1KG चांदीची किंमत किती होती? १५०० टक्क्यांनी झाली वाढ

Skin Care : चेहऱ्यावर ब्लीच करण्याआधी 'या' पाच महत्त्वाच्या गोष्टी नक्की जाणून घ्या

Rohit Sharma: रोहित भाऊ, वडापाव खाणार का? चाहत्याच्या प्रश्नावर हिटमॅनने दिलं त्याच्या स्टाईलमध्ये उत्तर, Video व्हायरल

Amla Benefits: वजन कमी होते, केस गळणे कमी होते...; रोज सकाळी एक आवळा खल्ल्याने होतात हे आरोग्यदायी फायदे

SCROLL FOR NEXT