Devendra Fadanvis/sanjay Raut SaamTV
मुंबई/पुणे

दोन्ही बाजूचं चुकतंय, टाळी एका हाताने वाजत नाही; सत्ताधारी-विरोधकांना पवारांच्या कानपिचक्या

'असला हार आयुष्यात कधी घातला नव्हता, बारामती करांनी एक नंबरने निवडून दिलंय, पण त्यावेळी ही असला हार घातला नव्हता.'

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे : आता आपण बघतोय काय वक्तव्य करतात, समोरच्याबद्दल बोलण्याची योग्यता आहे की नाही हे बघत नाहीत आणि बोलतात. उचलली जीभ लावली टाळ्याला, दोन्ही बाजूचं चुकतंय टाळी एका हाताने वाजत नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) आज सत्ताधारी आणि विरोधकांचे कान टोचले आहेत. ते आज पुण्यातील खराडी येथे ऑक्सिजन पार्कचे भूमिपूजन कार्यक्रमासाठी आले होते यावेळी पर्यटन मंत्री आदिती तटकरे, आमदार सुनील तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) उपस्थित होत्या.

या कार्यक्रमावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांचे स्वागत मोठा हार घालून क्रेनचा वापर करुन घातला आणि या हारावरतीच पवारांनी भाषणाची सुरुवात केली. ते म्हणाले, 'असला हार आयुष्यात कधी घातला नव्हता, बारामती करांनी एक नंबरने निवडून दिलंय, पण त्यावेळी ही असला हार घातला नव्हता इथे खर्च करण्यापेक्षा ज्या घटकाला गरज आहे तिथे हा खर्च करावा. ते जास्त उपयुक्त होईल, असा विचार इथून पूढे कार्यकर्त्यांनी करायला हवा असा सल्ला अजित दादांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला. तसंच मी कुणाचा हिरमोड करु इच्छित नाही असही ते म्हणाले.

यशाने हुरळून जायचं नाही, अपयशाने खचायचं नाही -

ते पुढे म्हणाले, 'ऑक्सिजनबाबत आपण स्वयंपूर्ण झालेलो आहोत, आता सुविधा मिळताहेत, ऑक्सिजन पार्कची नवीन संकल्पना समोर आलीय, याचा उपयोग नागरिकांना होईल. कोरोना (Corona) काळात ऑक्सिजनची गरज प्रकर्षाने जाणवली आपल्याकडे असणाऱ्या यंत्रणांचा वापर एकमेकांना संपवण्याकरता झाला नव्हता, पण आता आपण बघतोय काय वक्तव्य करतात, समोरच्याबद्दल बोलण्याची योग्यता आहे की नाही हे बघत नाही आणि बोलतात उचलली जीभ लावली टाळ्याला दोन्ही बाजूचं चुकतंय टाळी एका हाताने वाजत नाही.

इच्छुकांची संख्या आता वाढलीय, ते कामाला लागलेय, ज्याला जे परवडेल ते त्यांनी करावं, कायद्याच्या चौकटीत करावं 3 चाच प्रभाग राहणार आहे. भौगोलिक दृष्ट्या पुणे हे राज्यातील सर्वात मोठं शहर झालेलं आहे. पिंपरी चिंचवडची (PCMC) जबाबदारी 25 वर्ष माझ्याकडे दिली. पण गेल्या वेळी पराभव स्वीकारावा लागला, पण यशाने हुरळून जायचं नाही आणि अपयशाने खचून जायचं नसतं असा कानमंत्रही त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

SCROLL FOR NEXT