ajay baraskar saam tv
मुंबई/पुणे

Ajay Baraskar : अजय बारस्कर यांच्याशी संबंध नाही; देहू संस्थान जरांगेंच्या पाठीशी (पाहा व्हिडिओ)

Maratha : कार्ला फाटा येथे रास्ता रोको आंदोलन झाल्यानंतर मावळ मधील मराठा आंदोलक हे देहूतील संत तुकाराम महाराजांच्या वंशजांना भेटण्यासाठी गेले हाेते.

दिलीप कांबळे

Dehu News :

मराठा आंदाेलक मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांच्यावर आरोप करणाऱ्या अजय बारस्कर (ajay baraskar) यांचा देहू आणि देहू संस्थानशी संबंध नाही असा खूलासा आज (शनिवार) देहू संस्थानने केला आहे. देहू संस्थान हे मनोज जरांगे यांच्या पाठीशी असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करणाऱ्या अजय बारस्कर यांनी जरांगे यांना उपोषण सोडण्यासाठी संत तुकाराम महाराजांचा आदेश आहे असे वक्तव्य केले. त्याचप्रमाणे बारस्कर यांनी मी देहूतून आलो आहे असे देखील सांगितले. त्यावर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या वंशजांनी बारस्कर हा माणूस देहूतील नसून त्याला कोणत्याही प्रकारे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या नावाचा स्वतःच्या हितासाठी वापर करण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले आहे.

अजय बारस्कर यांचा देहू आणि देहू संस्थानशी कोणताही संबंध नसताना ते विनाकारण देहूची नाव खराब करत आहेत. देहू संस्थान हे मनोज जरांगे यांच्या पाठीशी असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

कार्ला फाटा येथे रास्ता रोको आंदोलन झाल्यानंतर मावळ मधील मराठा आंदोलक हे देहूतील संत तुकाराम महाराजांच्या वंशजांना भेटण्यासाठी गेले. मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी वक्तव्य करणाऱ्या अजय बारस्कर यांचा निषेध देहू संस्थान कडून व्यक्त करण्यात आला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

SCROLL FOR NEXT