Ahmednagar News Saam Tv
मुंबई/पुणे

सासूच्या निधनाचा धक्का सहन झाला नाही, अवघ्या अर्ध्या तासात सूनेने प्राण सोडले

राहुरीतील घटना, सासू सूनेवर एकाचवेळी अंत्यसंस्कार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मोबीन खान

अहमदनगर - सध्या समाजामध्ये सासू सुनेचे वाद विकोपाला गेल्याच्या अनेक घटना आपण पाहत असतो. मात्र सासूचा मृत्यू झाल्याचे समजताच अवघ्या अर्ध्या तासात सुनेचा देखील हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यु झाला. राहुरी शहरातील आझाद चौक येथील ही घटना असून सासू सूनेवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. सासू सुनेचे प्रेम पाहून अनेक जणांनी हळहळ व्यक्त केली. मालनबाई शेजूळ असं सासुचे तर मिराबाई शेजूळ असे सुनेचे नाव आहे.

अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील राहुरी शहरातील आझाद चौक परिसरात शेजूळ कुटूंब वास्तव्यास आहे. त्या कुटुंबातील सासू-मालनबाई पांडुरंग शेजूळ यांना ७ जुलै रोजी रात्रीच्या दरम्यान अचानक त्रास होऊ लागला. घरातील नातेवाईकांनी त्यांना शहरातील एका रूग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र रात्री एक वाजे दरम्यान हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने त्या मयत झाल्या. काही वेळातच सुन- मिराबाई भाऊसाहेब शेजूळ, वय ५५ वर्षे यांना त्रास होऊ लागल्याने त्यांना देखील त्याच रूग्णालयात दाखल करण्यात आले.

हे देखील पाहा -

सासू मयत झाल्याचे समजताच त्यांना हृदयविकाराचा तिव्र झटका आला. आणि दिड वाजे दरम्यान म्हणजे सासू मयत झाल्याच्या अवघ्या अर्ध्या तासाने सुनेनेही अखेरचा श्वास घेतला. सुनेने अखेरच्या श्वासापर्यंत सासूची साथ सोडली नाही. मृत्यूनंतरच्या प्रवासाला देखील दोघी बरोबरच राहिल्या.

मृत्यू नंतर सासू मालनबाई व सून मिराबाई या दोघींची अंत्ययात्रा एका मागे एक त्यांच्या घरापासून ते गणपती घाट पर्यत नेण्यात आली. अंत्यविधीसाठी सामाजिक, राजकीय व व्यापारी क्षेत्रातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता. मात्र आजच्या काळात सासू व सुनेचे असे प्रेम पाहून अनेक जणांनी हळहळ व्यक्त केली. तसेच शेजूळ कुटूंबावर कोसळलेल्या या दुखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देवो अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cabinet Meeting: दिल्ली-मुंबई-कोलकाता-चेन्नई कनेक्टिव्हिटीला बूस्ट; 7 हाय-डेन्सिटी कॉरिडॉरचा होणार विस्तार, रेल्वे नेटवर्कमध्ये मोठा बदल!

Property Rights: नातवाला नाही मिळणार आजोबांची जमीन, हायकोर्टाने दिला महत्वपूर्ण निर्णय

Maharashtra News Live Update: मुंबई-सावंतवाडी नव्या रेल्वेचे सावंतवाडीत जल्लोषात स्वागत

Hair Care: केसातील कोंडा आणि खाजेपासून मिळवा आराम; नारळाच्या तेलात मिसळा 'ही' एक गोष्ट

Salary Planning : UPI वापरता, पण पैशांचे नियोजन करता का? पगार मिळण्याआधीच शिका या ५ बचतीच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT