काल अहमदाबादमध्ये (Ahmedabad Plane Crash) विमान कोसळल्यानंतर संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त केली जात आहे. एकूण २४२ प्रवाशांचा यात मृत्यू झाला आहे. यामध्ये डोबिंवलीच्या केबिन क्रू रोशनी सोनघरे यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तिच्या मृत्यूने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी टाहो फोडला आहे. दरम्यान, रोशनीच्या प्रवासाबद्दल तिच्या मामांनी माहिती दिली आहे.
प्रवीण सुखदरे असं रोशनीच्या मामाचं नाव आहे. त्यांनी रोशनीचा एअर होस्टेस होण्यापर्यंतचा संघर्ष कसा होता याबाबत संपूर्ण माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलंय की,रोशनी आमच्या अंगा खांद्यावर मोठी झाली आहे. मध्यमवर्गीय कुटूंबातून जन्मलेली रोशनी 10 बाय 10 च्या घरातून 1 bhk मध्ये आली.एअर होस्टेस बनण्याची तिची इच्छा होती.तिच्या आई वडिलांनी खूप कष्ट केले ,तिने प्रयत्न केले आणि तिचा स्वप्न तिने पूर्ण केले.
स्पाईस जेट मध्ये होती. त्यानंतर दोन वर्षापूर्वी एयर इंडिया मध्ये जॉईन झालीचार दिवसांपूर्वी गावी आली होती. सगळ्यांना भेटली कुलदेवतेचे दर्शन घेतले.दोन दिवसांपूर्वी ती डोंबिवलीहून अहमदाबादला गेली.एक आठवड्या पूर्वी तिच्याशी लग्नाबाबत बोलणं झालं होतं .तुला जो आवडेल त्याच्याशी लग्न करून देऊ, मात्र त्यानंतर काही बोलणं झालं नाही.घरी दोन मामा आणि नातेवाईक आहेत.तिच्या आईला लो बीपीचा त्रास आहे तिला अजून काहीच सांगितलं नाही .
एयर इंडिया कंपनीशी काल पासून संवाद साधतोय ,त्यांनी माझा नंबर घेतला आहे ,तिचे वडील आणि भाई अहमदाबादला गेले आहेत ,एयर इंडिया चे काही सहकारी त्यांच्या सोबत आहेत, असं त्यांनी सांगितलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.