दिवा : दिवा शहरात लसीकरण केंद्राची संख्या वाढविण्यासाठी आज भाजप तर्फे "हक्क दिवेकरांचा" हे आंदोलन करण्यात आले. दिवा प्रभाग समिती कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासनाविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तर शिवसेनेचे नगरसेवक आपल्या मर्जीतल्या लोकांना आणि कार्यकर्त्यांना लस मिळवून देतात असा आरोप भाजप जिल्हा उपाध्यक्ष निलेश पाटील यांनी केला. (agitation by BJP in Diva for vaccination)
हे देखील पहा -
दिवा शहराची लोकसंख्या आता पाच लाख पर्यंत पोहेचली आहे. मात्र दिव्यात लसीकरण केंद्र फक्त एकच आहे. तर आठवड्यात फक्त दोन दिवस लस येते. तेथे सुद्धा नागरिकांना रात्री 12 वाजेपासून लाईन लावावी लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. लसीकरण केंद्र वाढवा या माणगी करता आज भाजप तर्फे "हक्क दिवेकरांचा" हे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासनाच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांना पत्र देत लसीकरण केंद्रे वाढवा अशी मागणी केली आहे.
या आंदोलनात भाजप गटनेते मनोहर डुंबरे, दिवा भाजप पदाधिकारी निलेश पाटील, आदेश भगत, सचिन भोईर, रोशन भगत, अर्चना पाटील, विजय भोईर,गणेश भगत आणि भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष निलेश पाटील यांनी लसीकरण केंद्र वाढवा अशी मागणी करत शिवसेनेच्या नगरसेवकावर आरोप केले. पाटील यांनी सांगितले की, शिवसेनेचे नगरसेवक आपल्या मर्जीतल्या लोकांना आणि कार्यकर्त्यांना लस मिळवून देतात. काल परवा आम्ही आवाज उठवल्यानंतर काल यांनी महापौरांना पत्र दिलं लसीकरण केंद्र वाढवा म्हणून. पाच महिने हे काय झोपले होते का ? आताही एक लसीकरण केंद्र सुरू आहे.
आता या आरोपाला शिवसेना नगरसेवक व माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी उत्तर दिले आहे. मढवी यांनी सांगितले की लसीकरण केंद्रात सीसीटीव्ही फुटेज आहे. नगरसेवक किती वेळेला इथे कोणाला घेऊन जातात हे दिसेल. भाजप पदाधिकारी करत काही नाही फक्त आरोप करतात. खोट बोल पण रेटून बोल हे भाजप करते, काम कुठे करते? असे नगरसेवक मढवी यांनी सांगितले. तर दुसरे लसीकरण गणेश विद्यालयात चालू करणार आहोत असे शिवसेना पदाधिकारी चरण म्हात्रे यांनी सांगितले. त्यामुळे आता तरी दिव्यात लसीकरण केंद्र वाढणार का हे पाहावे लागेल.
Edited By - Akshay Baisane
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.