Aghori pooja at cremation ground for death of friend Pune Shocking incident  Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News: मित्राचा मृत्यू होण्यासाठी स्मशानात अघोरी पूजा; पुण्यातील धक्कादायक घटना, परिसरात खळबळ

Pune Sortapwadi Aghori Pooja: व्यावसायिक मित्राचा मृत्यू होण्यासाठी एका व्यक्तीने चक्क स्मशानभूमीत जाऊन अघोरी पूजा केली.

Satish Daud

नितीन पाटणकर, साम टीव्ही

Pune Sortapwadi Aghori Pooja

विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात जादूटोण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. स्मशानभूमीत अघोरी पूजा केली जात असल्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत दोन तृतीयपंथीयांनी चितेजवळ जादूटोण्यासारखे अघोरी कृत्य केल्याचे समोर आले होते. ही घटना ताजी असतानाच आता हवेली तालुक्यातही असाच काहीसा प्रकार घडला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्यावसायिक मित्राचा मृत्यू होण्यासाठी एका व्यक्तीने चक्क स्मशानभूमीत जाऊन अघोरी पूजा केली. इतकंच नाही, तर त्याच्या कुटुंबाचा सर्वनाश व्हावा यासाठी मंत्राचे पठण देखील केले. ही धक्कादायक घटना हवेली तालुक्यातील सोरतापवाडी गावात घडली.

या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांत संशयित व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गणेश तात्यासाहेब चौधरी असे अघोरी पूजा घालणाऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश हा सावकार असून त्याची तक्रारदार अमोल मानमोड यांच्यासोबत व्यावसायिक भागीदारी आहे. काही दिवसांपासून व्यावसायिक कारणावरून दोघांमध्ये मतभेद झाले होते.

यातून अमोल मानमोडे यांचा मृत्यू होऊन त्यांच्या कुटुंबाचा सर्वनाश व्हावा, यासाठी चौधरी याने गुरुवारी रात्री स्मशानभूमीत वेगवेगळ्या अघोरी पूजा केल्या. हा प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात आला. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती तक्रारदाराला दिली. दरम्यान, मानमोडे यांनी चौधरीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup : दक्षिण आफ्रिकाविरुद्धचा पराभव भोवणार, तिघांपैकी कुणाची विकेट पडणार? टीम इंडियात मोठा उलटफेर होणार

Shevgyachya Shenganchi Bhaji Recipe : भाकरी अन् झणझणीत शेवग्याच्या शेंगांची भाजी, एक घास खातच येईल गावाची आठवण

Maharashtra Live News Update: पुण्यात पाण्याच्या शोधात असणारा बिबट्या विहिरीत पडला

Seviyan Kheer Recipe: सणासुदीला घरी आलेल्या पाहुण्यासाठी झटरपट बनवा स्वादिष्ट शेवयाची खीर, वाचा सोपी रेसिपी

संतापजनक! बाथरूमच्या फलकावर लावला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो

SCROLL FOR NEXT