Eknath Shinde Vs MVA  Saam TV
मुंबई/पुणे

'अंगावर आले तर शिंगावर घेऊ'; आमदारांच्या राड्यानंतर शिंदे गटाचा आक्रमक पवित्रा

अधिवेशानाच्या आजच्या पाचव्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आमदार एकमेकांवर धावून गेल्याचं चित्र पाहायला मिळालं.

Jagdish Patil

Maharashtra Monsoon Session: राज्याचे पावसाळी अधिवेशन वादळी नव्हे तर वादग्रस्त ठरलं आहे. अधिवेशानाच्या आजच्या पाचव्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आमदार एकमेकांवर धावून गेल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. आज सकाळपासून विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी गटाच्या आमदारांनी विरोधकांविरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली.

शिंदे गटातील आमदारांनी आज थेट उद्धव ठाकरे, शरद पवरांनाच (Uddhav Thackeray, Sharad Pawar) टार्गेट केल्यामुळे विरोधक देखील आक्रमक झाले. दरम्यान, विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले असता आमदार चक्क एकमेकांच्या अंगावरती धावून गेल्याच प्रकार आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर पाहायला मिळाला.

पाहा व्हिडीओ -

आमदारांच्या या सर्व राड्यानंतर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले (MLA Bharat Gogawale) यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांना इशाराच दिला. 'आम्ही कोणाच्या वाट्याला जात नाही मात्र अंगावर आलात तर शिंगावर घेऊ' असं गोगावाले म्हणाले.

ते पुढं म्हणाले, 'आज शिवसेना-भाजप (Shivsena) युतीच्या माध्यमातून आम्ही विरोधकांविरोधात आंदोलन केलं, मागील चार दिवसांपासून ते आमच्याविरोधात घोषणाबाजी करत आहेत. आम्हाला गद्दार गद्दार म्हणात आहेत. जे आम्ही केलं नाही ते आरोप आमच्यावर करत आहेत. मात्र, आम्ही सत्य समोर आणण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांना आमचं बोलणं झोंबलं कारण आम्ही त्यांचा खरा इतिहास काढला असल्याचं ते म्हणाले.

तसंच अनिल देशमुखे, अनिल परब, सचिन वाझे असतील कोविड मधला भ्रष्टाचार असेल हे सर्व आम्ही बोहेर काढलं ते सत्य त्यांना झोंबलं. आमचं आंदोलन झाल्यानंतर विरोधक आले असते तर त्यांना पायऱ्या मोकळ्या करुन दिल्या असत्या, मात्र आमच्या मध्ये येण्याचा प्रयत्न करणार असाल तर आम्ही देखील बांगड्या भरलेल्या नाहीत, आम्ही देखील जशास तसं उत्तर दिलं. शिवाय त्यांनी डिवचलं तर आम्ही कोणाला सोडणार नाही असंही आमदार भरत गोगावले म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Foods: हिवाळ्यात भारतातील या ठिकाणांना भेट देण्याचा विचार करत आहात का?  'हे' पदार्थ नक्की खाऊन बघा..

Samosa Recipe: घरच्या घरी नाश्त्याला बनवा खुसखुशीत समोसा; बाहेरचे तेलकट पदार्थ खाणे द्याल सोडून

Maharashtra Politcs : निकालाच्या आदल्या दिवशी भाजपला मोठा धक्का; मुंबईतील बड्या नेत्याने हाती धरली उद्धव ठाकरेंची मशाल

Night Jasmine: घराच्या बागेत लावा पारिजातकाचं झाड, मनमोहक सुगंधाने बहरेल तुमची बाग

Saam Exit Poll : सावंत की पडळकर? मतदारांचा कौल कुणाला, पाहा एक्झिट पोल VIDEO

SCROLL FOR NEXT